News Flash

वाड्यातील वैद्यकीय अधिकारी अखेर निलंबित

महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस असोसिएशन पालघरतर्फे शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती.

(संग्रहित छायाचित्र)

पालघर :  महिलांशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारीवरून वाडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जाधव यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

वाडा ग्रामीण रुग्णालयात सहा वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत  डॉ. जाधव यांनी महिला कर्मचारी यांच्याशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारी सप्टेंबर २०२० मध्ये काही कर्मचाऱ्यांनी दाखल केल्या होत्या.   तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांनी महिनाभराच्या कालावधीनंतर त्या प्रकरणी चौकशी केली होती. त्यानंतर त्यांची मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर बदली केली होती.

महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस असोसिएशन पालघरतर्फे   शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती. याप्रकरणी  जिल्हा प्रशासनाने शिस्तभंग कारवाई प्रस्तावित केली होती.  अखेर पाच महिन्यांच्या कालावधीनंतर डॉ. प्रदीप जाधव यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. त्याला पालघर मुख्यालयात सामान्य रुग्णालय येथे हजर राहण्याची तसेच निलंबनाच्या काळात खासगी नोकरी किंवा अन्य कोणताही उद्योग, धंदा, व्यापार न करण्याच्या सूचना आदेशात उल्लेखित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2021 12:22 am

Web Title: medical officer finally suspended akp 94
Next Stories
1 गवतापासून जैव इंधनाची निर्मिती
2 महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेतही भाजपपुढे संकट
3 अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज
Just Now!
X