News Flash

वेदनाशामक गोळ्यांचा सर्वत्र स्वयंस्फूर्त वापर

वेदनाशामक औषधांचे कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय सेवन घातक असतानाही बहुराष्ट्रीय औषध उत्पादक कंपन्यांच्या क्रोसिन, अ‍ॅनासिन, सारीडॉन, डी-कोल्ड, टोटल कॉम्बिफ्लाम आणि कॉम्बिफ्लाम प्लस या औषधांचा सर्रास केला

| July 23, 2013 04:55 am

वेदनाशामक औषधांचे कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय सेवन घातक असतानाही बहुराष्ट्रीय औषध उत्पादक कंपन्यांच्या क्रोसिन, अ‍ॅनासिन, सारीडॉन, डी-कोल्ड, टोटल कॉम्बिफ्लाम आणि कॉम्बिफ्लाम प्लस या औषधांचा सर्रास केला जात असल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. जाहिरातीच्या माध्यमातून या औषधांच्या परिणामकारतेचा आवाक्याबाहेर प्रचार केला जात असून सदर औषधे औषध विक्रेत्यांकडे काऊंटरवर सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांचा खपदेखील प्रमाणाबाहेर वाढला आहे.
या सर्व औषधांमध्ये पॅरासिटमॉल समान घटक आहे. त्यामुळे डोकेदुखी, शरीरदुखीसाठी स्वत:च याची मागणी केली जाते आणि औषध विक्रेते ते सहजतेने देतातही. यापैकी क्रोसिन, डी-कोल्ड, अ‍ॅनासिन, सारीडॉन यांच्या जाहिरातींचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे यांची मागणीदेखील प्रचंड प्रमाणावर आहे; परंतु यामुळे देशभरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. काऊंटरवर उपलब्ध असलेल्या वेदनाशामक औषधांच्या मेडइंडियाच्या केमेस्ट्री ‘ओव्हर द काऊंटर’ या शीर्षकाखालील अहवालात स्वऔषध सेवनाच्या घातक प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली असून यामुळे आरोग्याच्या नवनव्या समस्या उद्भवू लागल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. शहरी भागातील ३७ टक्के आणि ग्रामीण भागातील १७ टक्के लोक सेल्फमेडिकशनचे बळी ठरत आहेत. क्रोसिन, रॅनटेक, जेलुसिल, सारीडॉन, अ‍ॅनासिन, नाइस, अ‍ॅव्हिल, ब्रुफेन, पॅरासिटमॉल यांचा खप सर्वाधिक आहे.
पाश्चिमात्य देशांमध्ये बंदी असलेली अ‍ॅन्लाजीन, ब्रुफेन, अ‍ॅनासिन या गोळ्या भारतात धडाक्यात विकल्या जात आहेत. ताज्या माहितीनुसार एकटय़ा नागपूर शहरात पॅरासिटमॉलचे १०० पेक्षा अधिक ब्रॅण्ड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वॉशिंग पावडर, सौंदर्यप्रसाधने, साबणे यांच्या उत्पादनांच्या जाहिरातीप्रमाणे या औषधांची सेलिब्रिटीच्या माध्यमातून जाहिरात केली जात असल्याने त्याच्या साइड इफेक्टकडे कोणाचेही लक्ष नाही. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेच्या अध्यक्ष डॉ. वर्षां ढवळे यांच्याशी संपर्क साधला असता वेदनाशामक गोळ्यांचे स्वत:हून सेवन अत्यंत घातक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या गोळ्यांचा डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय वापर होता कामा नये, यासाठी सरकारने एक विशिष्ट धोरण आखण्याची सूचनाही त्यांनी केली. वेदनाशामक औषधांचा स्वयंस्फूर्त वापर घातक असून शेवटी रुग्णाला डॉक्टरकडेच यावे लागते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2013 4:55 am

Web Title: medical world worry over spontaneous pain killer tablets uses
Next Stories
1 महामार्गावरील खड्डे बुजवा, अन्यथा गुन्हे नोंदवू – तटकरे
2 गडचिरोली सीईओच्या कारभारात काँग्रेस आमदारांची लुडबुड
3 सोलापुरात आणखी १७ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार?
Just Now!
X