News Flash

एकेकाळच्या या टॉप अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये करायचंय कमबॅक; म्हणाली, “आता मुलं स्थिरावली आहेत…”

विशेष म्हणजे ती बॉलिवूडमधली सर्वात सुंदर अभिनेत्री होती, पण तरीही तिचा कुणी बॉयफ्रेंड नव्हता आणि कोणत्याही अफेअरच्या चर्चा रंगल्या नाही.

नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक नावाजलेली अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी शेषाद्री. ‘हीरो’, ‘दामिनी’, ‘घायल’ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या मीनाक्षीने लग्नानंतर सिनेसृष्टीला रामराम ठोकला. मात्र आता मोठ्या ब्रेकनंतर मिनाक्षीला बॉलिवूडमध्ये कमबॅक करायचंय.

एका मुलाखती दरम्यान तिनं हा खुलासा केलाय. “जर भविष्यात एखाद्या चांगल्या भूमिकेसाठी ऑफर आली तर त्यावर मी विचार करेल”, असं यावेळी मिनाक्षीने सांगितलंय. अभिनेत्री मिनाक्षी गेल्या २६-२७ वर्षांपासून फिल्मी दुनियेपासून दूर आहे. जेव्हा तिने करियरमध्ये भरारी घ्यायला सुरवातच केली होती, त्यावेळी १९९५ साली तिने लग्न केलं आणि पतीसह ती अमेरिकेत राहू लागली. आता सध्या तिची एक मुलगी आणि एक मुलासह ती राहतेय. मुलगी नोकरी करतेय तर मुलगा शिक्षण घेतोय. इतक्या वर्षात तिने तिच्या कुटुंबाला प्राधान्य देत अमेरिकेतल्या मित्र-मैत्रिणींसोबत आपला वेळ घालवत आहे. आता तिची दोन्ही मुलं स्थिरावली आहेत. त्यामुळे आता ती पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याचा विचार करतेय. अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री तिच्या अदाकारीला योग्य न्याय देतील अशा स्किप्ट आणि भूमिकेच्या शोधात आहे.

बॉलिवूडमधली ‘आइस मेडेन’, पण कुणीही बॉयफ्रेंड नव्हता…

अभिनेत्री मिनाक्षीला एकेकाळी ‘आइस मेडेन’ असं म्हटलं जात होतं. ‘आइस मेडेन’ म्हणजेच सगळ्यात सुंदर पण इतरांपेक्षा खूप वेगळी महिला. ती खरंच बॉलिवूडमधल्या इतर अभिनेत्रींपेक्षा खूप निराळी होती. या मुलाखतीत बोलताना मिनाक्षी म्हणाली, “जेव्हा जेव्हा तिला आइस मेडेन म्हटलं जायचं त्या त्या वेळी तिला खूप राग यायचा.” मिनाक्षीबद्दल विशेष म्हणजे ती बॉलिवूडमधली सर्वात सुंदर अभिनेत्री होती, पण तरीही तिचा कुणी बॉयफ्रेंड नव्हता आणि कोणत्याही अफेअरच्या चर्चा रंगल्या नाही.

अनेक फिल्ममेकर्ससोबत सुरू आहे बातचीत

“मी यापुढे कधीच बॉलिवूडमध्ये अभिनय करणार नाही अशा अनेक चर्चा फिल्ममेकर्स करू लागले होते. या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या. पण यात कोणतंही सत्य नाही. पण मी फक्त ब्रेक घेतला होता”, असं अभिनेत्री मिनाक्षी या मुलाखतीत म्हणाली. यापुढे बोलताना ती म्हणाली, “हा खूप मोठा ब्रेक ठरलाय, पण मी आनंदी आहे. माझी याबाबत कोणतीही तक्रार नाही. मला त्यावेळी माझ्या कुटुंबासोबत अमेरिकेत रहायचं होतं. मी अनेक फिल्ममेकर्ससोबत बातचीत सुरू केलीय. यावर फिल्ममेकर्सनी माझ्यासाठी अनेक संधी असल्याचं देखील सांगितलंय.”, असं देखील मिनाक्षी म्हणाली. त्यामुळे बॉलिवूडमध्ये कमबॅकसाठी तिची तयारी असल्याचं देखील तिने सांगितलंय.

क्षेत्रात नव्याने प्रवास सुरू करतेय…

बॉलिवूडमध्ये कमबॅकचा विचार करताना तिने इतर अभिनेत्रींसोबत स्वतःची तुलना केली. यावेळी ती म्हणाली, “इतर अभिनेत्रींच्या प्रोफेशनल लाइफमध्ये काय चाललंय हे माहित नाही. पण मला माझ्या स्वतःबद्दल माहित आहे. आता मी एका न्यूकमर सारखीच झाली आहे. एका मोठ्या गॅपनंतर मी सुरवात करतेय. जवळजवळ २७ वर्ष…आता मला कोणत्या भूमिका मिळतात आणि मी काय स्विकारतेय हे पहावं लागणार आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 1:31 pm

Web Title: meenakshi seshadri want to comeback after long gap from film industry prp 93
Next Stories
1 किमान हातातल्या गोष्टी तरी मार्गी लावा, संभाजीराजेंचं ठाकरे सरकारला आवाहन
2 “राष्ट्रवादी व काँग्रेसने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतलंय, हे त्यांनी लक्षात घ्यावं”
3 मराठा आरक्षण : “विरोधात गेलो तर ताबडतोब विचारा, भुजबळ तुम्ही आमच्या विरुद्ध का?”
Just Now!
X