आई ही मुलांची पहिली गुरू असते त्यानंतर खऱ्या अर्थाने या जगाची ओळख मुलांना होते.आईने केलेल्या काबाड कष्ठामुळे अनेकांना जगण्याची दिशा मिळते,मुलांना नोकरी लागते.ते केवळ आणि केवळ आईने केलेले संगोपण आणि संस्कार यामुळे शक्य असते. अशाच एका माउलीने काबाड कष्ट करून दोन मुलींना संगणक अभियंता तर एकीला उच्चशिक्षित केलेल आहे. सायरा नजीर सय्यद वय-५७ अस या माऊलीचे नाव आहे.त्यांच्या शिक्षणासाठी गेल्या ३६ वर्षांपासून सायरा या सायकल दुरुस्थितीच काम करत आहेत.त्यांनी केलेल्या कष्टाच फळ मिळालं असून आज तिन्ही मुली उच्चशिक्षत आहेत.त्यातील दोघींचं लग्न झालं असून त्या सुखाने संसार करत आहेत.

सायरा नजीर सय्यद वय-५७ रा.पिंपरी-चिंचवड यांनी केलेलं कष्ट त्यांच्या मुलींसाठी खूप महत्वाचं होत.त्यांनी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतुन मार्ग काढत मुलींना शिक्षण दिले.वहिदा,निलोफर आणि साजिदा अशी त्यांच्या मुलींची नावे आहेत.सायरा यांना एक मुलगा असून तो देखील उच्च शिक्षित आहे.सायरा यांचं १२ पर्यंत शिक्षण झालेलं असून १९८२ ला त्यांचा निकाह नजीर यांच्याशी झाला.निकाहच्या तीन महिन्यानंतर त्यांना सेंट्रल गव्हरमेंट खात्यातील नोकरीचा पत्र आलं.परंतु त्यांच्या सासऱ्यानी नोकरी करण्यास नकार दिला त्यामुळे आलेली संधी निघून गेली.काही वर्षांनी पतीला दुर्धर आजार जडला.यामुळे पतीला काही काम करता येत नव्हतं.मुलींना शिक्षण देण्याचं ठरवलं मात्र पतीचा त्याला विरोध होता.तो जुगारून मुलींना सायरा यांनी शाळेत पाठवलं.त्यासाठी त्यांनी सायकल दुरुस्तीतीचे काम घरासमोरील मोकळ्या जागेत सुरू केले.

व्यवसाय जोमाने चालत होता,महिन्याकाठी हजार रुपये मिळायचे.तेव्हा पंचर ला ६० पैसे घेत असत अस सायरा यांनी सांगितलं.आता तेच पंचर २० रुपयांना झालं आहे.मुलींनी १० पर्यंतच शिक्षण मराठी शाळेत पूर्ण केलं.मुलींनी कोणत्याही गोष्टींसाठी हट्ट केला नाही.मिळेल त्यावर समाधान मानलं.एकेकाळी मुलींनी दुसऱ्यांनी दिलेले जुने कपडे घालून दिवस काढले.हे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले.मात्र कधी हेच पाहिजे म्हणून त्रास दिला नाही.आज मला मुलींचा अभिमान वाटतो आहे अस सायरा म्हणाल्या.

मुलींनी अगोदर मिळेल ते काम केलं.पुढील शिक्षणासाठी त्यांनी मेहनत घेतली.त्या आज उच्च शिक्षित असून वहिदा आणि साजीदा या हिंजवडी मधील नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यकरत आहेत.तर त्यांची दुसरी बहीण निलोफर मेडिकल व्यवसायात आहे.वहिदा सर्वात लहान असून दोन्ही बहिणीचा निकाह झाला आहे.हे सर्व पाहून आनंद होत आहे.मुलींनी भरभरून प्रेम दिलं आहे. माझ्या कष्टच फळ मिळालंय. शिक्षणाला मरण नाही.शेवटच्या क्षणापर्यंय शिक्षण घ्या अस सायरा म्हणाल्या.सायरा यांच्या पतीच पाच वर्षांपूर्वी निधन झालं.त्यांना खंबीर पाठिंबा देण्याचं काम त्यांनी केलं आहे.व्यवसाय असल्याने पैश्याची कमी पडली नाही.कोणताही व्यवसाय करा,पण तो मन लावून करा त्यात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल असा सल्ला सायरा यांनी दिला आहे.मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नका.जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत काम करत राहणार असून कोणावर अवलंबून राहणार नाही.आता सायकल दुरुसाठीच काम मानसिक त्रासामुळे सायरा यांनी कमी केलं आहे.परंतु आजही त्यांच्यात तेवढीच ऊर्जा आहे.त्यामुळे आई ही ईश्वराच रूप असत ते या माऊलीच्या रूपातून पाहायला मिळत आहेत.