कोल्हापूर येथे भाजप राज्य पदाधिकाऱ्यांची बठक ४ मे रोजी, तर प्रदेश कार्यकारिणीची बठक ५ व ६ मे रोजी होत आहे. राजकीय परिस्थितीसह विविध विषयांवर चर्चा या बठकीत होणार असून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सर्व पदाधिकारी, भाजपचे मंत्री व आमदार उपस्थित राहाणार आहेत. समारोपास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र व राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. रावसाहेब दानवे यांची प्रदेशाध्यपदी निवड करण्यात आली आहे. या कार्यकारिणीची विविध विषयांवर राज्य बठक कोल्हापूर येथे आयोजन केले आहे. ४ मे रोजी श्री महालक्ष्मीला अभिषेक घालून या बठकीस सुरवात होईल. पहिल्या दिवशी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बठक होईल. ५ रोजी प्रदेश कार्यकारिणीची बठक होणार आहे. याचे उद्घाटन राज्य अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते होईल.
बठकीचा समारोप ६ मे रोजी होईल. समारोपास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. बठकीस दहा हजार कार्यकत्रे उपस्थित राहतील. पेटाळा येथील मदानावर सभामंडप उभारून बठकीची व्यवस्था केली जाणार आहे. यामध्ये अधिवेशन काळात झालेले सर्व विषय, सध्याची राजकीय परिस्थिती, शासनाने घेतलेल्या निर्णयांबाबत अभिनंदनाचा ठराव, तसेच कार्यकर्त्यांनी मांडलेल्या विषयांवर चर्चा होणार आहे. भाजपने सदस्य नोंदणी अभियानात राज्यात एक कोटी तर देशात दहा कोटी सदस्य नोंदणी केली आहे. यामध्ये आणखी वाढ करण्यासाठी पुढील उपक्रमांबाबतही चर्चा होईल. तसेच भविष्यात विविध महामंडळांच्या निवडी होतील, यावरही विचारविनीमय होईल.
कोल्हापूर टोलबाबत सकारात्मक निर्णय
कोल्हापूरच्या टोल बाबत नियुक्त मूल्यांकन समितीचा अहवाल लवकरात लवकर घेऊन ३१ मे पर्यंत यावर योग्य व सकारात्मक निर्णय घेतला जाईल. टोलचे पसे महापालिकेनेच द्यायचे आहेत. पण त्यासाठी राज्य सरकार महापालिकेला बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देईल. आयआरबी कंपनी ६०० कोटी रुपयांची मागणी करत आहे. मात्र ती योग्य नाही. याबाबत मूल्यांकन समितीचा अहवाल आल्यावर नेमके किती पसे द्यायचे याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. पत्रकार बठकीस आमदार सुरेश हाळवणकर, महानगर अध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक आर. डी. पाटील, जिल्हा अध्यक्ष रामभाऊ चव्हाण, ज्येष्ठ कार्यकत्रे बाबा देसाई उपस्थित होते.