08 July 2020

News Flash

‘एलबीटी’ दरसूचीसाठी राज्यातील पालिका आयुक्तांची बैठक प्

जकात रद्द करून एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू करण्याची अधिसूचना राज्यशासनाने काढली आणि राज्यभरातील महापालिकांची त्यादृष्टीने जय्यत तयारी सुरू झाली.

| February 28, 2013 03:17 am

जकात रद्द करून एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू करण्याची अधिसूचना राज्यशासनाने काढली आणि राज्यभरातील महापालिकांची त्यादृष्टीने जय्यत तयारी सुरू झाली. व्यापाऱ्यांचा विरोध, एलबीटीची दरसूची व लगतच्या महापालिकांमध्ये आवश्यक असलेला समन्वय आदी मुद्दय़ांवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी २ मार्चला मुंबईत पालिका आयुक्तांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यानंतरच ‘एलबीटी’तील तरतुदींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
िपपरी पालिकेची श्रीमंती जकातीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. १ एप्रिलपासून जकात रद्द होणार असल्याने नव्या करआकारणीतून ही श्रीमंती टिकेल का, याविषयी संभ्रमावस्था आहे. त्यामुळेच, पहिल्या वर्षी करआकारणी व्यवस्था बसण्यात वेळ जाईल व कदाचित काही प्रमाणात उत्पन्न कमी मिळेल, अशी शक्यता आयुक्तांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. राज्यसरकारने २५ फेब्रुवारीला अधिसूचना काढली असली तरी एलबीटी लागू करण्याची जय्यत तयारी पिंपरी पालिकेने बऱ्याच आधीपासून केली आहे. आता  सर्वप्रथम नोंदणीला प्राधान्य राहणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य कामे करण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात येते.
‘एलबीटी’ आकारणीवरून काही शंका आहेत. विशेषत: दरसूचीवरून मतभिन्नता आहे. सर्व महापालिकेत एलबीटीचे दर समान ठेवता येतील का, याविषयी शासनाकडून चाचपणी होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2013 3:17 am

Web Title: meeting of corporation commissioner for lbt rateindex
Next Stories
1 सावंतवाडी नगरपालिकेचा शिलकी अर्थसंकल्प सादर
2 कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार कायम
3 मुक्त विद्यापीठाच्या कार्यक्रमातून कुसुमाग्रजांच्या साहित्याचे दर्शन
Just Now!
X