सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरप्रकारांवर थातुरमातूर उत्तरे देणाऱ्या राज्यमंत्री रणजित कांबळे यांच्या उत्तरावर नाखुश असलेल्या सदस्यांच्या संतापामुळे सभापती शिवाजीराव देशमुख यांना हस्तक्षेप करावा लागला.
बीड जिल्ह्य़ातील सार्वजनिक बांधकाम विभागात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सहीने मोठय़ा प्रमाणात कामे मंजूर करण्याचा करण्याचा प्रकार अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या तपासणीत उघडकीस आली. यासंदर्भातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंत्यावरील कारवाईसंबंधी धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत प्रश्न विचारला होता. गेल्या चार वर्षांपासून आवक- जावक रजिस्टरमध्ये खाडाखोड, तांत्रिक मंजुरीच्या रजिस्टरवर कार्यकारी अभियंत्यांची सही नसल्याचे उघडकीस आले. ही बाब ध्यानात आल्यानेच शासनाने बीडच्या अतिरिक्त जिल्हाधिऱ्यामार्फत चौकशी करण्यात आली.
तपासणीचा अहवाल सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्याला सादर करूनही दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई न झाल्याने परिषद सदस्यांचा संताप संयुक्तिक होता.