देशातील शेतकऱ्यांचा पहिला संप अशी ओळख असलेल्या चरी येथील शेतकरी संपाचा ८७ वा वर्धापन दिन कार्यक्रम ग्रामस्थांनी उत्सााहात साजरा केला .परंतु या ऐतिहासिक संपाचे यथोचित स्मारक कधी होणार , असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत . ३ वर्षांपूर्वी १ कोटी रूपये मंजूर होवून देखील अद्याप या स्मारकाची वीटदेखील रचली गेली नाही. याबद्दल ग्रामस्थाांनी नाराजी व्यक्त केली.

कसेल त्याची जमीन म्हणजे कुळकायदा. रायगड जिल्ह्य़ातील अलिबागजवळच्या चरी येथील शेतकऱ्यांनी केलेल्याा देशातील पहिल्या संपामुळे हे धोरण अंमलात आले. २७ नोव्हेंबर १९३३ ते १९३९ असा तब्बल ७ वष्रे इतक्या प्रदीर्घ काळ चाललेल्या या शेतकरी संपाचे नेतृत्व स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांनी केले . महत्वाचे म्हणजे त्या७चे सहकारी १८ पगड जातीचे होते .

ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

शेतकऱ्यांच्या या अभूतपूर्व संपाला शुक्रवारी ८ वष्रे पूर्ण झाली . खोतीविरूद्ध शेतकऱ्यांनी दिलेला लढा यशस्वी झाला. चरीच्या शेतकरी संपाचा वर्धापन दिन दरवर्षी ग्रामस्थे मोठया अभिमानाने साजरा करतात. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी चरी गावाला भेट दिल्यानंतर या ऐतिहासिक संपाचे महत्व लक्षात आले . या संपाचे स्मारक व्हाावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्मारकाच्या कामासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे तब्बल एक कोटी रूपये मंजूर केले. त्याचा आराखडादेखील तयार करण्यात आला . यामध्ये समृदध् ग्रंथालय, वाचनालय, या लढ्याचा चित्ररूपी इतिहास व पुतळे, सभागृह, उद्यान यांचा समावेश आहे. परंतु अद्याप या स्मा रकाच्या कामावर एक छदामही खर्च झाला नाही. हे पसे गेले कुठे असा प्रश्न ग्रामस्था उपस्थित करताहेत . वर्धापन दिनाच्यास पाश्र्व भूमीवर चरीच्या् ग्रामस्थांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्ता केली . वारंवार पाठपुरावा करूनदेखील यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे . शासकीय यंत्रणेने यात तातडीने लक्ष घालून प्रेरणादायी अशा या लढयाच्याा स्मृंती जतन कराव्यांत अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे .आज ग्रामस्थांदनी या चरीच्या ऐतिहासिक संपाचा वर्धापन दिन साजरा केला.

यावेळी माजी आमदार पंडित पाटील , शेकापचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, भावना पाटील , परीसरातील सरपंच , ग्रामस्थ हजर होते. या संपाशी चरीतील शेतकऱ्यांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. हे स्मारक झाले तर त्यनिमित्ताने बाहेरचे लोक इथे येतील . त्यांना या संपाचा इतिहास माहीत होईल. तसेच आमच्या नवीन पिढीला त्याततून प्रेरणा मिळेल . आम्हीच सरकारच्या भूमिकेकडे डोळे लावून बसलो आहोत . शासन दरबारी यासंदर्भात पत्रव्ययवहारदेखील केला परंतु त्या ला प्रतिसाद मिळाला नाही . शासनाने यात लक्ष घालून हे काम तडीस न्यावे.  – नारायण जाधव, ग्रामस्थ चरी