अकोला : खामगाव तालुक्यात एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री घडला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी बुधवारी दोघांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक केली.हैदराबाद व बुलढाणा जिल्हय़ातील खेर्डा येथील बलात्कार व हत्येच्या घटनांनंतर खामगाव तालुक्यात ही संतापजनक घटना घडली. येथील एक मतिमंद अल्पवयीन मुलगी मंगळवारी सायंकाळी काही वस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी गावातीलच एकाने तिला निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याच्या साथीदारानेही तिच्यावर अत्याचार केला. बराच वेळ उलटल्यानंतरही मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी ज्ञानेश्वर तायडे आणि दत्ता साठे या दोन आरोपींना अटक केली व त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2019 12:03 am