सध्या देशभरात #MeToo मोहिमेचं वादळ आलं असून अनेक मोठी नावं समोर येत आहेत. याची सुरुवात केली ती अभिनेत्री तनुश्री दत्ताने. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर अनेकांनी पुढे येऊन आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली. तनुश्री दत्ताने 2008 मध्ये ‘हॉर्न ओके’ चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तवणूक केल्याचा आरोप केला आहे. तनुश्री दत्तानंतर बॉलिवूडमधील अनेक महिला सेलिब्रेटी पुढे आल्या असून आपले अनुभव शेअर करत आहेत. दरम्यान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना शैक्षणिक क्षेत्राचाही यामध्ये समावेश असल्याचं सांगितलं आहे.

‘शैक्षणिक संस्थांमधूनही अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्या संबंधित संस्थांनी घटनेची गंभीर दखल घ्यावी. शैक्षणिक संस्थांनी प्रकरणाची योग्य दखल घेतली पाहिजे’, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

#MeToo शोषणाचे आरोप करणाऱ्यांनी सबळ पुरावे द्यावेत-मेलानिया ट्रम्प

#MeToo मोहिमेविषयी ऐश्वर्या राय -बच्चन म्हणते…

#MeToo मोहिमेमुळे अनेक मोठी नावं समोर आली असून यामध्ये बॉलिवूड पहिल्या क्रमांकावर आहे. नाना पाटेकर, आलोकनाथ, विकास बहल, चेतन भगत, विवेक अग्निहोत्री, रजत कपूर, कैलाश खेर यांच्यावर महिलांनी गैरवर्तवणुकीचा आरोप केला आहे.

#MeToo : ‘आता का ऐवजी आत्ताच का नाही असा विचार करा !’- प्रकाश राज

नाना पाटेकर –
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने गैरवर्तणुकीचा आरोप केला आहे. ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणावेळी नानांनी गैरवर्तन केल्याचं तनुश्रीने म्हटलं. तनुश्रीच्या या आरोपानंतर चित्रपटसृष्टीमध्ये याविषयी चर्चा रंगल्याचं दिसून येत आहे.

आलोक नाथ –
विनता नंदा यांनी फेसबुक पोस्ट लिहून आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. पोस्टमध्ये त्यांनी आलोक नाथ यांच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी तसे थेट संकेत त्यांनी दिले आहेत. त्यानंतर ‘तारा’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नवनीत निशान यांनीसुद्धा अभिनेते आलोक नाथ यांच्यावर आरोप केले आहेत.

#MeToo: आमिर खानचा मोठा निर्णय, लैंगिक अत्याचाराचे आरोप झालेल्या दिग्दर्शकाचा चित्रपट सोडला

चेतन भगत –
प्रसिद्ध लेखक चेतन भगत याच्यावर देखील एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. आरोप करणाऱ्या महिलेने चेतन भगत यांच्यावर त्रास दिल्याचा आरोप करत दोघांमध्ये झालेल्या व्हॉट्सअॅपवरील चर्चेचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियावर पोस्ट केले. महिलेच्या या पोस्टनंतर चेतन भगतने सोशल मीडियावर महिलेची जाहीर माफी मागितली.

विकास बहल –
अभिनेत्री कंगणा रणौतने ‘क्वीन’ चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. कंगनाच्या आरोपानंतर या चित्रपटातील सहकलाकार नयनी दीक्षित हिनं देखील विकास बहल यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला.

विवेक अग्निहोत्री-
तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर आरोप केल्यानंतर तिने चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीवर देखील आरोप केले आहे. ‘चॉकलेट’ चित्रपटाच्या सेटवर विवेक अग्निहोत्री यांनी मला कपडे काढायला सांगितले होते, असा आरोप तनुश्रीने केला.

रजत कपूर –
चित्रपट निर्माता, अभिनेता रजत कपूर यांच्यावर दोन महिलांनी लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला आहे. त्यानंतर अल्पावधीत रजत कपूर यांनी माफी मागत हे प्रकरण पूर्णपणे शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

कैलाश खेर –
प्रसिद्ध गायक कैलाश खेरवर एका महिला पत्रकाराने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. त्यानंतर पार्श्वगायिका सोना मोहापात्रानेही कैलास खेरवर आरोप केले आहेत. परंतु कैलाश यांनी हे सारे आरोप फेटाळून लावले आहेत.