News Flash

तळीये गाव पुन्हा वसवण्याची जबाबदारी म्हाडाने घेतली; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची घोषणा

तळीये गाव पुन्हा वसवण्यासाठी म्हाडाने पुढाकार घेतला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे.

Jitendra-Awhad
तळीये गाव पुन्हा वसवण्याची जबाबदारी म्हाडाने घेतली; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची घोषणा

महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळून तब्बल ३२ घरं दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप झाली. या दुर्घटनेत मालमत्तेच्या नुकसानीबरोबरच मोठी जीवितहानी झाली आहे. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, गावात जवळपास ४२ घरे असून जवळील डोंगराचा एक भाग गुरुवारी संध्याकाळी त्यांच्यावर पडल्याने सर्व जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आता हे गाव पुन्हा वसवण्यासाठी म्हाडाने पुढाकार घेतला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे.

“कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झालेले तळीये हे पूर्ण गाव वसवण्याची जबाबदारी म्हाडाने घेतली स्वीकारली आहे. मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला, कि कुणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती”, असं ट्वीट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी भूस्खलनग्रस्त तळिये गावाला भेट दिली आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी या प्रदेशात होणाऱ्या मुसळधार पावसापासून बचाव करण्यासाठी लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करत, ‘तुम्ही दुःखातून सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ’ अशी ग्वाही दिली. तसेच, डोंगर उतारावरील सर्व वस्त्यांचे पुनर्वसन केले जाणार असून आवश्यक ती सर्व मदत केली जाणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2021 7:12 pm

Web Title: mhada took the responsibility of rehabilitating taliye village jitendra awhad announcement rmt 84
Next Stories
1 पुणे – बंगळूरू महामार्गावर पाणी साचल्याने साताऱ्यात शेकडो वाहने रोखली!
2 “अलमट्टीच्या विसर्गात नंतर अडथळे येतात, आत्ताच प्रयत्न करा”, देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला!
3 रत्नागिरी : खेड पोसरे येथे दरड कोसळून १७ जण बेपत्ता, शोध कार्य सुरु
Just Now!
X