वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांच्या प्रवेशाकरिता राज्य स्तरावर घेण्यात आलेल्या ‘एमएचटी-सीईटी’ या प्रवेश परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला आहे. परीक्षेत मुंबईचा स्मित रामभिया आणि सोलापूरचा विजय मुंद्रा हे दोघे संयुक्तपणे राज्यातून प्रथम आले आहेत. या दोघांनी पीसीएममध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) २०० पैकी १९७ गुण मिळवले.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा ११ मे रोजी घेण्यात आली होती. या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण ३ लाख ८९ हजार ५२० पैकी ३ लाख ७६ हजार २८२ म्हणजेच ९६.६० टक्के उमेदवारांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज, ३ जून रोजी जाहीर झाला. यात मुंबईचा स्मिथ रामभिया आणि सोलापूरचा विजय मुंद्रा हा राज्यातून पहिला आला. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या http://www.dtemaharashtra.gov.in/mhtcet2017 या संकेतस्थळावर उमेदवारांना निकालाची प्रत डाउनलोड करता येणार आहे.

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत

Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग

How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?