News Flash

दुचाकीवरून उत्तर प्रदेशकडे निघालेल्या मजुराचा अपघाती मृत्यू

जखमींवर रुग्णांलयात उपचार सुरु आहेत

संग्रहित छायाचित्र

लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : मुंबईहून दुचाकीने उत्तर प्रदेशातील गावाकडे निघालेल्या मजुराचा शनिवारी अपघाती मृत्यू झाला. बाळापूरजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत या मजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्याची सहा वर्षीय मुलगी आणि एक नातेवाईक गंभीर जखमी झाले. कमला शंकर यादव (३२) रा.जौनपूर उत्तर प्रदेश असे मृताचे नाव आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे राज्यात असंख्य परप्रांतीय मजूर अडकले आहेत. या मजुरांना राज्यात पाठविण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली. रेल्वेने त्यांना सोडण्यात येत आहे. तरीही अनेक मजूर मिळेल त्या मार्गाने गाव गाठण्यासाठी धडपड करीत आहेत. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील कमला शंकर यादव, त्याची सहा वर्षीय मुलगी मोनाली यादव व नातेवाईक सुजीत यादव यांच्यासह दुचाकीने (क्र. एमएच ०४ सीएक्स ४८३) गावाकडे निघाले होते.

शनिवारी पहाटे राष्ट्रीय महामार्गावर बाळापूरजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यामध्ये कमला यादव यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर सहा वर्षीय मुलगी व नातेवाईक गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 10:02 pm

Web Title: migrant worker death in the road accident scj 81
Next Stories
1 मुंबई – अहमदाबाद महामार्गावर पायपीट करत असलेल्या मजुराचा अपघातात मृत्यू
2 MLC Polls : काँग्रेसतर्फे राजेश राठोड आणि राजकिशोर मोदी यांना उमेदवारी
3 गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
Just Now!
X