News Flash

उजनीवर स्थलांतरित पक्ष्यांचा वावर वाढला 

उजनी जलाशयाचे मुख्य आकर्षण असलेल्या फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्ष्याची मात्र सध्या काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

उजनीवर स्थलांतरित पक्ष्यांचा वावर वाढला 
(संग्रहित छायाचित्र)

एजाजहुसेन मुजावर

गेल्या काही दिवसांपूर्वी उजनी धरणात तयार झालेल्या पोषक वातावरणामुळे देशविदेशातील विविध स्थलांतरीत पक्षी दाखल होऊ लागले आहेत. या पक्ष्यांमध्ये मंगोलियातून दाखल झालेला चक्र वाक आणि तिबेटमधील पट्टकदंब हंस हे पक्षी निरीक्षकांचे मुख्य आकर्षण आहे. उजनी जलाशयाचे मुख्य आकर्षण असलेल्या फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्ष्याची मात्र सध्या काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

हिमालयातील मानसरोवर व तिबेटातील पाणथळांवरील पट्ट कदंब हंस (बार हेडेड गूज) व मंगोलियातून चक्र वाक (रुडी शेल्डक) उजनीवर येऊ न दाखल झाले आहेत. पांढरेशुभ्र डोके त्यावर दोन काळे समांतर पट्टय़ा हे कदंब हंस ओळखण्याची खूण आहे.

हळदीकुंकू या स्थानिक पक्ष्यापेक्षा मोठय़ा आकाराचे शरीर असलेल्या या हंसामध्ये गुलाबी चोच व नारंगी रंगाचे पाय असतात. जलाशयाच्या काठावर दलदल भागावर व गाळपेर शिवारात खाद्यान्न शोधताना या परदेशी पक्ष्यांचे दृश्य अत्यंत मनमोहक असते.

प्रणयी जोडी म्हणून ख्याती असलेले चक्र वाक अर्थात ब्राह्मणी बदक हे देखणे पक्षी मंगोलियातून उजनी काठावर या आठवडय़ात येऊ न दाखल झाले आहेत. स्थानिक बदकांपेक्षा मोठय़ा आकाराची ही बदके सोनेरी रंगाची असतात. त्यांची चोच काळी तर पाय पुसट पांढरे असतात. नर चक्र वाक बदकाच्या गळ्यात काळा गोफ असतो.  चित्रबलाक, नळ्या, पाणकावळे, शेकाटय़ा वारकरी, राखी बगळे हळदीकुंकू बदके लक्षणीय संख्येने आढळून येत आहेत.

उजनीवरील पक्षीसौंदर्यस्थळे

करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली, टाकळी, कात्रज, रामवाडी, खातगाव, केतुर, केडगाव, कुगाव तसेच डिकसळजवळच्या रेल्वेचा जुन्या पुलाजवळचा परिसर आणि इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव व पळसदेव या ठिकाणी विविध रंगी पक्ष्यांचा वावर पाहायला मिळतो.

या वर्षी उजनी लाभक्षेत्रात विपुल पाऊ स झाल्याने शेती व पिण्याच्या पाण्याची गरज भासत नसल्याने धरणातून पाणी सोडले नाही.

उजनी जलाशयाच्या सौंदर्यातील मुख्य घटक म्हणून ओळख असलेले फ्लेमिंगो अर्थात रोहित अद्याप आलेले नाहीत. दरवर्षी डिसेंबरमध्ये सुमारे ८० ते ९० टक्के धरण भरलेले असते व जलाशयाच्या काठावर अनुकूल परिस्थती निर्माण होऊ न पक्ष्यांना खाद्य उपलब्ध होत असते. मात्र या वर्षी सध्या धरणात १०० टक्कय़ांहून अधिक पाणी साचून राहिल्याने पक्ष्यांचा चराऊ भाग अद्याप पाण्याखाली बुडून आहे. त्यामुळे पक्ष्यांनी धरणाकडे पाठ फिरवली आहे. पुढील काही दिवसांत फ्लेमिंगोसह अन्य स्थलांतरित पक्षी येण्याची शक्यता आहे.

-डॉ. अरविंद कुंभार, पक्षी अभ्यासक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 12:01 am

Web Title: migratory birds flocked to ujani abn 97
Next Stories
1 भक्ताच्या हाकेला विठ्ठल धावला !
2 मंत्र्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या हव्यासापोटी आरोग्य यंत्रणा कोलमडणार!
3 Coronavirus: राज्यात दिवसभरात ५ हजारांहून अधिक जणांची करोनावर मात