News Flash

कोयना परिसराला भूकंपाचे सौम्य धक्के

दोन्ही धक्क्यांच्या लहरी सौम्य असल्याने कुठेही कसलीही हानी झाली नाही.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने ही माहिती दिली (संग्रहित छायाचित्र)

कराड : कोयना धरण व परिसराला शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे दोन सौम्य धक्के बसले. भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता २.९ व ३.०० रिश्टर स्केल अशी नोंदली गेली. पहिला धक्का २.५५ मिनिटांनी तर, लगेचच ३ ते ४ मिनिटांच्या अंतराने भूकंपाचा आणखी एक सौम्य धक्का जाणवला.

दोन्ही धक्क्यांच्या लहरी सौम्य असल्याने कुठेही कसलीही हानी झाली नाही. मात्र, जमीन थरथरल्याने लोक घराबाहेर पळाले. भूकंपाच्या धक्क्याचे केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात जावळे गावाच्या वायव्येला ८ किमी अंतरावर तसेच कोयना धरणापासून १३.६ किमी अंतरावर होते. या भूकंपांचे केंद्रबिंदू जवळपास ८ किमी खोल असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 12:19 am

Web Title: mild tremors to the koyna area akp 94
Next Stories
1 ‘राजकारण न करता पदाधिकारी, नगरसेवकांच्या सहकार्याची गरज’
2 विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यातच अँटीजेन चाचणी
3 मनपा कोविड सेंटरमध्ये प्राणवायूचे ५० सिलिंडर वापराविना पडून