News Flash

गृहनिर्माण प्रधान सचिवपदी म्हैसकर; तर MMRDA महानगर आयुक्तपदी श्रीनिवास यांची नियुक्ती

आर. ए. राजीव यांचा कालावधी संपुष्टात आल्याने वर्णी

सौजन्य- Indian Express

राज्याच्या गृहनिर्माण प्रधान सचिवपदी मिलिंद म्हैसकर, तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (MMRDA) महानगर आयुक्तपदी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची वर्णी लागणी आहे. आर. ए. राजीव यांचा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांच्या जागी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची वर्णी लागली आहे. या पदाचा अतिरिक्त कारभार तूर्तास अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांच्याकडे सोपवण्यात आला होता. एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची या पदावर नियुक्ती झाल्यानंतर सोनिया सेठी यांना त्यांच्याकडे पदाभार सोपवण्यास सांगितलं आहे. एस. व्ही. आर श्रीनिवास हे १९९१च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. एमएमआरडीए महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांना मुदतवाढ नाकारण्यात आल्याने ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली होती. अखेर एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची त्यांच्या जागी वर्णी लागली. तर मिलिंद म्हैसकर यांची वर्णी एस.व्ही.आर श्रीनिवास यांच्या जागी लागली आहे.

राज्याच्या गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्ती झालेले मिलिंद म्हैसकर हे १९९२ च्या बॅचचे अधिकारी आहेत. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. महसूल आणि वन विभागतही प्रधान सचिव म्हणून त्यांनी काम केलं आहे.

 

आर.ए. राजीव हे २८ फेब्रुवारीला निवृत्त झाले होते. त्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम केल्याने त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. मुंबईत सुरु असलेल्या ३३७ किमी मेट्रो मार्गाचं काम त्यांच्या नेतृत्वात सुरु होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 1:41 pm

Web Title: milind mhaiskar appoing as a new housing secretary rmt 84
Next Stories
1 डिसले गुरुजी पुन्हा चमकले… जागतिक स्तरावर मिळाले आणखी एक सन्मानाचे पद
2 निर्बंध उल्लंघन केल्यानंतर सहा आस्थापनांवर कारवाई
3 डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे होम-हवन
Just Now!
X