सैनिक शाळा सातारा येथील सन 2020-21 च्या सत्रातील सहावी आणि नववीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रवेशासाठी ठराविक नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी 23 सप्टेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. या प्रवेशांसाठी पाच जानेवारी 2020 रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. सैनिक शाळा सातारा संरक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त अधिपत्याखाली 1961 साली स्थापन झाली आहे.

ऑनलाईन अर्ज भण्यासाठी http://www.sainiksatara.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज भरताना आवश्यक त्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट आपल्यासोबत ठेवावा. ऑनलाईनवर पूर्णपणे भरलेल्या प्रवेश अर्जाची प्रिन्टेड प्रत व डिमांड ड्राफ्ट आणि सोबतची जोडपत्रे सैनिक शाळा साताराच्या कार्यालयात पोहोचवण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2019 रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असेल. सामान्य वर्ग (जनरल), संरक्षण दलातील आजी/माजी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी 400 रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या वर्गातील मुलांसाठी 250 रुपये ऑनलाईन नोंदणी शुल्क आहे.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
The senior clerk of Ghati Hospital was caught by the anti corruption department team while taking Rs
घाटी रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक तीन हजार घेताना “लाचलुचपत” च्या सापळ्यात
Demolition of Shiv flyover delayed again due to examinations Mumbai
मुंबई: परीक्षांमुळे शीव उड्डाणपुलाचे पाडकाम पुन्हा लांबणीवर

इयत्ता सहावीतील प्रवेशासाठी उमेदवार एक एप्रिल 2008 ते 31 जुलै 2010 (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान जन्मलेला असावा. इयत्ता नववीतील प्रवेशासाठी उमेदवार एक एप्रिल 2005 ते 31 मार्च 2007 (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान जन्मलेला असावा व सध्या मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत असावा. इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी प्रश्नपत्रिका फक्त इंग्रजीमधून असतील. इयत्ता सहावीसाठी 60 जागांसाठी प्रवेश दिला जाईल, तर नववीतील प्रवेशासाठी सात जागा उपलब्ध असतील.