दूध उत्पादक शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला बुधवारी हिंसक वळण लागले. कोल्हापूरमधील जयसिंगपुरात आंदोलकांनी गोकुळ दूध संघाचा टँकर पेटवला. तर जनतारा शाळेजवळ आंदोलकांनी २० कॅन दूध रस्त्यावर ओतले.

दुधाला प्रति लिटर पाच रुपये दराने अनुदान मिळावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यभरात आंदोलन सुरु केले आहे. बुधवारी या आंदोलनाचा तिसरा दिवस असून या आंदोलनामुळे शहरात दूध टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

खासदार राजू शेट्टी पालघरमध्ये ठाण मांडून असून दापचेरी चेकपोस्टवर ते थांबले आहेत. गुजरातमधून येणारे दूध रोखण्यासाठी शेट्टी पालघरला पोहोचले आहेत. तर दुसरीकडे कोल्हापूरमधील जयसिंगपुरात आंदोलकांनी गोकुळ दूध संघाचा टँकर पेटवला. तर जनतारा शाळेजवळ आंदोलकांनी २० कॅन दूध रस्त्यावर ओतले.