राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 3 रुपये दरवाढ देण्यात आली असून याची अंमलबजावणी 21 जुलैपासून केली जाणार आहे. या दरवाढीमुळे सध्याच्या दूध दरात कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही अशी माहिती स्वराज दूध संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील सहकारी आणि खाजगी दुध उत्पादक संघांची पुण्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर दरवाढ देण्याबाबत बैठक पार पडली. दशरथ माने,राजीव मित्रा,प्रवीण आवटी आणि संजय मिश्रा यासह अनेक डेअरी चालक या बैठकीला उपस्थित होते.

यावेळी रणजीत सिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, राज्यात जवळपास 24 दूध उत्पादक शेतकरी संघ असून त्यांची प्रति लिटर पाच रुपये मागणी लक्षात घेता आजच्या बैठकीत येत्या २१ जुलैपासून तीन रुपये प्रति लिटर देण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात आणखी दरवाढ केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.