27 May 2020

News Flash

दूध उत्पादकांना करोनाचा फटका

सहकारी दूध संघांना एक दिवस दूधपुरवठा बंद ठेवावा लागत आहे.

संग्रहित छायाचित्र

करोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात वाढल्याने त्याचा मोठा परिणाम दूध व्यवसायावर होत आहे. टाळेबंदीमुळे दुधाची विक्री थांबली आहे. परिणामी अनेक सहकारी दूध संघांना एक दिवस दूधपुरवठा बंद ठेवावा लागत आहे. या साऱ्याचा फटका ग्रामीण भागातील शेतकरी आणि दूध उत्पादकांना बसला आहे.

देशव्यापी टाळेबंदीमुळे दुधाची विक्री थांबली आहे. त्यामुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा व तालुका सहकारी दूध संघाकडेही अतिरिक्त दुध शिल्लक राहात आहे. दूध संघ बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते. हे टाळण्यासाठी राज्याचे दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी ‘महानंदा’स तोडग्याचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले होते. दूध महासंघानेही तातडीने असा प्रस्ताव दुग्धविकास खात्यास सादर केला. या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता देऊन २०० कोटी रुपये तत्काळ मंजूर केले.

दूध महासंघामार्फत जिल्हा दूध संघ आणि तालुका सहकारी दूध संघ यांचे अतिरिक्त दूध हे शासन दराप्रमाणे २५ रुपये हमीभावाने संकलित केले जाणार आहे. संकलित दूधाची महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या प्रकल्पाद्वारे भुकटी केली जाईल. सहकारी दूध संघ आणि खासगी दूध संघांचे भुकटी प्रकल्प आहेत. त्यांच्याशी करार करून दूध भुकटी तयार केली जाणार आहे. यामुळे राज्यात दररोज १० लाख लिटर दुधाची भुकटी तयार होणार आहे. ही योजना येत्या दोन-तीन दिवसांत सुरू होईल. दूध भुकटी साठवण्याची व्यवस्था शासनाने केली आहे. ज्या वेळी दूध व्यवसायाची परिस्थिती सुधारेल, त्या वेळी सरकारकडून भुकटीची विक्री केली जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 12:24 am

Web Title: milk producers face affect of corona abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 जळगावात तीन करोना संशयित महिलांचा मृत्यू
2 सांगलीत १३४ जणांची चाचणी नकारात्मक
3 टाळेबंदीत पोलीसांच्या गाडीतच ओली पार्टी; पोलिसासह तिघावर गुन्हा
Just Now!
X