10 April 2020

News Flash

एमआयएम – वंचित बहुजन आघाडी विधानसभेसाठी स्वबळ अजमावणार?

एमआयएमकडून चार उमदेवारांची घोषणा, आतापर्यंत एकूण सात जणांची उमदेवारी केली निश्चित

लोकसभा निवडणुकीस एकत्र सामोरे जाणारे वंचित बहुजन आघाडी व एमआयएम आता विधानसभेसाठी स्वबळ अजमावणार असल्याचे दिसतं आहे. कारण, विधानसभा निवडणुकीत युती असणार की नाही, हे अद्याप स्पष्ट केलेले नसले तरी, एमआयएमकडून चार उमेदवारांची आज घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमधील युतीची शक्यता काहीशी धुसर दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच यांची युती तुटल्याच्या बातम्या येत असताना, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितबरोबर जाण्याचे संकेत दिले होते. मात्र, आज अचानक एमआयएमकडून चार उमेदवारांची नावं घोषित करण्यात आल्यानं आता एमआयएम-वंचित आघाडी विधानसभेला स्वबळावर सामोरी जाणार असल्याचं दिसत आहे.

एमआयएमकडून रविवारी पुणे छावणीमधून हिना शफीक मोमीन, सोलापूर मध्यमधून फारूख मकबूल शाब्दी, सोलापूर दक्षिणमधून सुफिया तौफिक शेख व सांगोला (सोलापूर) मतदारसंघातून शंकर भगवान सरगर यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या अगोदरही एमआयएमकडून तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत एकूण सात जागांवरील उमेदवार एमआयएमकडून निश्चित करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीनेच ही यादी जाहीर करत असल्याचं पत्रकात म्हटलं आहे. पत्रकाखाली एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष, खासदार इम्तियाज जलील यांची स्वाक्षरी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2019 9:27 pm

Web Title: mim announces four candidates msr 87
Next Stories
1 Video : गप्प बसा… आता जर कोणी घोषणा दिली तर तिकीटच देणार नाही : अजित पवार
2 आता गुलाल उधळायला मला साताऱ्यात बोलवा; शरद पवारांनी उदयनराजेंना ‘स्वाभिमाना’वरून पुन्हा डिवचलं
3 पुण्यातील चार जागा राष्ट्रवादी लढवणार, तीन जागा काँग्रेसला : अजित पवार
Just Now!
X