News Flash

जातीय तेढ प्रकरणी MIM नगरसेवक अटकेत, भाजपाच्या ५ नगरसेवकांवरही गुन्हा

शुक्रवारी औरंगाबाद महानगर पालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावावरून भाजपा आणि एमआयएम नगरसेकांमाध्ये हाणामारी झाली होती.

औरंगाबादमध्ये जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवकाला अटक अटक करण्यात आली आहे. तर भाजपाच्या पाच गरसेवकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल शुक्रवारी औरंगाबाद महानगर पालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावावरून भाजपा आणि एमआयएम नगरसेकांमाध्ये हाणामारी झाली होती. यामध्ये महापालिकेत भाजपा नगरसेवकांनी एमआय़एमच्या नगरसेवकाला बेदम मारले होते. त्यानंतर बाहेर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेत्यांवर हल्ला केला होता. त्यामुळे काल शहरात तणावाचे वातावरण निर्णाण झाले होते.

भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक सय्यद मतीनने यांच्या जबाबावरून हा गुन्हा नोंद करण्यात आल्याचे क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी सांगितले.

वाचा : औरंगाबाद: वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला बेदम मारहाण

शुक्रवारी महानगरपालिकेची समांतर वाहिनीसंदर्भात विशेष सभा बोलाविण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात येत होती. याला एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध दर्शवला. यामुळे संतप्त होत सभागृहातील भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, दिलीप थोरात, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, राज वानखेडे यांनी मतीन यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्याच्या प्रस्तावास विरोध करणाऱ्या मतीन यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा नोंदवावा, तसेच त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांकडे केली होती. या पार्श्वभुमीवर आज, शनिवारी मतीन यांना अटक करण्यात आली आहे.

वाचा – औरंगाबाद: भाजपा नेत्याची गाडी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी फोडली, चालकाला मारहाण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 12:18 pm

Web Title: mim corporator mateen who refuses to pay tribute to vajpayee is arrested
Next Stories
1 अभियांत्रिकीतील एका विषयाचा अभ्यासक्रम मराठीत
2 राज्यातील शैक्षणिक उणिवांवर केंद्राचे बोट!
3 औरंगाबाद: भाजपा नेत्याची गाडी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी फोडली, चालकाला मारहाण
Just Now!
X