राज्यात तापमान वाढ कायम; विदर्भात उष्णतेची लाट

पुणे : राज्यात सर्वच ठिकाणी निरभ्र आकाश तसेच कोरडय़ा हवामानाची स्थिती असल्याने कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सिअसवर गेल्याने अंगाची काहिली होत आहे.

Heat Wave, Heat Wave in Maharashtra, Temperatures Soar Beyond 40 Degrees, 40 Degrees Celsius, heat wave, summer, summer news, temperature change, temperature rise, rising temperatures, marathi news,
तापमानाने चाळिशी ओलांडली; राज्याच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा
As the temperature rises in the state of Maharashtra there is also an increase in the type of heat stroke pune
उष्माघाताच्या धोका! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर; जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे…
statue of Gond raje Bakt Buland Shah the founder of Nagpur city is Neglected by government
नागपूर नगरीच्या राजाची अजूनही उपेक्षाच!
maharashtra, Temperature rise, warning, heat wave, intensify, konkan, vidarbha, marathwada, summer, dry weather, sweating,
राज्यात तापमानवाढीचा इशारा, उष्णतेच्या झळा आणखी तीव्र होणार

किमान तापमानातील वाढीमुळे दिवसासह रात्रीही घामाच्या धारा निघत आहेत. तापमानातील वाढ पुढील काही दिवस कायम राहणार आहे. विदर्भामध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, कमाल तापमान ४४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राज्यात या आठवडय़ाच्या सुरुवातीपासूनच कमाल आणि किमान तापमानात झपाटय़ाने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाडय़ातील सर्वच ठिकाणी तापमान सरासरीच्या तुलनेत वाढले आहे. बहुतांश ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ झाली आहे. आकाश निरभ्र राहात असल्याने सूर्याची किरणे विनाअडथळा जमिनीवर येत असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. दुपारी अंग भाजून काढणारे ऊन पडत आहे. रात्रीही अंगातून घामाच्या धारा निघत आहेत.

राज्यात सोमवारी जळगाव, मालेगाव, सोलापूर, परभणी, नांदेड, बीड, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ येथील कमाल तापमान ४० अंशांपुढे नोंदविले गेले. राज्यातील उच्चांकी तापमान मालेगाव येथे ४१.६ अंश से. नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रात पुण्यात ३९.७ अंश कमाल तापमान आहे. इतर ठिकाणीही तापमानाचा पारा ३८ ते ४१ अंशांवर आहे.

 

तापमान                कमाल  किमान

(अंश सेल्सिअस)

मुंबई (कुलाबा)      ३१.७     २४.२

सांताक्रुझ               ३३.३     २३.५

अलिबाग               ३२.४     २२.८

रत्नागिरी               ३२.२    २४.७

पुणे                        ३९.७   १८.६

जळगाव                 ४१.०   १८.०

कोल्हापूर                ३७.६   २२.९

महाबळश्वर            ३४.७   २०.१

मालेगाव                 ४१.६   १९.६

नाशिक                   ३८.५   १७.४

सांगली                    ३८.५   २०.१

सातारा                    ३९.२   २०.५

सोलापूर                   ४१.२   २६.१

औरंगाबाद               ३९.०   २१.६

परभणी                   ४१.६   १९.५

नांदेड                      ४१.०   २३.०

बीड                        ४०.०   २०.६

अकोला                  ४१.१   २०.५

बुलडाणा                ३७.४   २५.०

ब्रह्मपुरी               ४०.७   २२.८

चंद्रपूर                   ४१.४   २६.४

गोंदिया                 ३५.४   १८.८

नागपूर                 ३९.१   २२.२

वाशिम                 ४०.०   २१.०

वर्धा                     ४०.०   २४.५

यवतमाळ           ४०.५   २३.०

मुंबईतील तापमानात घट

दोन दिवसांपूर्वी चाळीसच्या वर गेलेला मुंबईचा पारा जवळपास ६ अंश सेल्सिअसने घसरला आहे. दोन दिवस कडक उन्हाच्या झळा सहन केल्यानंतर बुधवारी मुंबईकरांना उन्हापाकून काहीसा दिलासा मिळाला आहे. बुधवारी ३३.३ अंश सेल्सिअस कमाल तर  किमान तापमान २३.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. कुलाबा विभागाने ३१.७ अंश सेल्सिअस कमाल तर २४.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली.