24 October 2020

News Flash

राज्यमंत्री बच्चू कडू करोना पॉझिटिव्ह

स्वतः ट्विट करुन बच्चू कडू यांनी दिली माहिती

बच्चू कडू (संग्रहित छायाचित्र)

राज्यमंत्री बच्चू कडू यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी करोना चाचणी करुन घ्यावी असं ट्विट करत बच्चू कडू यांनी ही माहिती दिली आहे. शुक्रवारीच उर्जा मंत्री नितीन राऊत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोघांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आता शनिवारी (आज) राज्यमंत्री बच्चू कडू यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

शुक्रवारी दोन मंत्री करोना पॉझिटिव्ह

शुक्रवारी उर्जामंत्री नितीन राऊत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोन मंत्र्यांना करोनाची बाधा झाली. या दोघांनीही यासंदर्भातली माहिती ट्विट करत दिली. तसंच लवकरच आपण करोनावर मात करुन लोकांच्या सेवेत हजर होऊ असाही विश्वास व्यक्त केला. इतकंच नाही तर जे चे कुणी संपर्कात आले आहेत त्यांनीही करोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहनही केलं.

मागील काही दिवसांपासून राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने लोकांच्या संपर्कात येत होते. अनेक कार्यक्रमांनाही त्यांची उपस्थिती होती. बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू यांनाही करोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू हे अचलपूरहून अमरावतीच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते आता उपचारांसाठी कोणत्या शासकीय रुग्णालयात दाखल होणार हे अद्याप समजू शकलेलं नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2020 6:01 pm

Web Title: minister bacchu kadu corona positive scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 “तारासिंह यांच्या निधनाने जनतेची कामे करणारा जनप्रतिनिधी गमावला”
2 पहाटेचा शपथविधी यशस्वी न होणे हीच फडणवीसांची खंत-उदय सामंत
3 नापास विद्यार्थ्यांची परीक्षा महिनाभरात; प्रमाणपत्रावर कोविड शेरा नाही : उदय सामंत
Just Now!
X