25 January 2020

News Flash

अभय योजनेअंतर्गत तीन हजार ५०० कोटी रुपयांचा कर भरणा

राज्यात एक जुलै २०१७ पासून वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू झाली.

(संग्रहित छायाचित्र)

वस्तू आणि सेवा कर विभागाने काही महिन्यांपूर्वी अभय योजना २०१९ अंमलात आणली होती. त्याअंतर्गत विवादित कर, व्याज, शास्ती, विलंब शुल्काच्या थकबाकीच्या रकमेपोटी ऑगस्ट महिन्यापर्यंत ३ हजार ५००कोटी रुपयांचा कर भरणा करण्यात आला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिली.

राज्यात एक जुलै २०१७ पासून वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू झाली. त्यापूर्वी राज्यात करविषयक अनेक कायदे अंमलात होते. काही कर विषयक कायद्यांचा वस्तू आणि कर प्रणालीत समावेश समावेश करण्यात आला होता. जुन्या कायद्यातील ३.७३ लाख प्रकरणे आणि खटले प्रलंबित असून त्यात कोट्यावधी रुपयांचा कर महसूल अडकून पडला होता. म्हणून शासनाने वस्तू आणि सेवा कर कायदा येण्यापू्र्वी अस्तित्वात असलेल्या कायद्याअर्तगत ३० जून २०१७ रोजी किंवा त्यापूर्वी संपणाऱ्या कालावधीसाठी आकारलेले कर, व्याज, शास्ती, किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीच्या तडजोडीसाठी अभय योजना २०१९ आणली होती. त्यातून विवादित कर, व्याज, शास्ती, किंवा विलंब शुल्क, थकबाकीची तडजोडीच्या प्रकरणांना अंशत: माफी देऊन कर भरण्यास प्रोत्साहन देण्यात आले होते. यातून १.४० लाख प्रकरणांमध्ये व्यापाऱ्यांनी अभय योजनेचा लाभ घेऊन ३ हजार ५०० कोटी रूपयांचा भरणा केला असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

First Published on September 11, 2019 3:05 pm

Web Title: minister sudhir mungantiwar abhaay yojana 2019 government got 3 thousand 500 crore tax maharashtra jud 87
Next Stories
1 मोहरमच्या शुभेच्छा दिल्याने खासदार अमोल कोल्हेंवर टीकेचा भडीमार
2 पन्हाळा गडावर रोमँटिक गाणं शूट करण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना अमोल कोल्हेंचं उत्तर
3 ‘भिडे गुरुजींची इस्रोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करा’; पंतप्रधान मोदींना पत्र
Just Now!
X