News Flash

राज्याचे शिक्षण मंत्री उदय सामंत यांची डिग्री बोगस?

माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या डिग्रीवर संशय घेणाऱ्या संस्थेने केला आरोप

माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या डिग्रीवर संशय निर्माण करणाऱ्या संस्थेने आता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची डिग्री बोगस असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी केअर ऑफ पब्लिक सेफ्टी संस्थेचे डॉ.अभिषेक हरिदास यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.

पत्रकार परिषदेत वाटण्यात आलेले पत्रक

राज्याचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या डिग्रीवर डॉ.अभिषेक हरिदास यांनी आक्षेप घेत संशय व्यक्त केला होता. त्यानंतर आज पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अनेक आजी माजी नेत्यांची नावे घेत त्यांच्या शैक्षणिक डिग्री बोगस असल्याचा दावा केला आहे. शिवसेना नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय रविंद्र सामंत यांची पदवी बोगस विद्यापीठाची आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला आहे.

डॉ.अभिषेक हरिदास म्हणाले, मंत्री उदय रवींद्र सामंत यांनी इलेक्शन कमिशन २०१९ च्या अॅफिडेव्हिटनुसार डिप्लोमा ऑटोमोबाइल हे ज्ञानेश्वर विद्यापीठातून झाले आहे. या पूर्वी भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांची पदवीही संत ज्ञानेश्वर विद्यापीठातली होती. तसेच शिवसेनेचे मनोहर जोशी हे ज्ञानेश्वर विद्यापीठाचे कुलपती होते. ज्ञानेश्वर विद्यापीठ  हे बोगस विद्यापीठ आहे कारण त्याची स्थापना ही ना राज्य सरकारने केली ना केंद्र सरकारने असंही हरिदास यांनी म्हटलं आहे. या आरोपांना राज्य सरकार किंवा उदय सामंत काही उत्तर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 8:28 pm

Web Title: minister uday samants degree is fake says dr haridas scj 81 kjp 91
Next Stories
1 महिलेला जाळल्याच्या गुन्ह्याचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार
2 बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या! प्रवीण तोगडियांची मागणी
3 डहाणूजवळच्या वाढवणमध्ये प्रमुख बंदर उभारण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Just Now!
X