News Flash

अल्पवयीन मुलाचा खून ; पाहुण्या मुलीची छेड काढतो म्हणून संपवले

मृताच्या डोक्याच्या मागील भागात घाव असून रक्त निघाल्याचे दिसत आहे.

आरोपीला अवघ्या दोन तासात अटक

चंद्रपूर : पाहुण्या मुलीकडे बघतो व तिची छेड काढतो, या कारणावरून सोळा वर्षीय संदेश रवि ठाकूर या मुलाचा खून झाल्याची घटना राजुरा शहरात आज सकाळी उघडकीस आली. दरम्यान, राजुरा पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपी बाल्या ऊर्फ राकेश वाघमारे याला अटक केली आहे.

राजुरा येथील इंदिरानगर परिसरात राहणारा संदेश रवि ठाकूर (१६) हा मुलगा जेवण करून रात्री दहा वाजताच्या सुमारास शतपावली करण्यासाठी निघाला, परंतु रात्री घरी परतलाच नाही. आज सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात मिळाला. संदेश हा रात्री घरी न आल्यामुळे सकाळी त्याच्या पालकांनी शोधाशोध सुरू केली. त्यांना सकाळी फिरणाऱ्या लोकांकडून एका मुलाचा मृतदेह शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात पडून असल्याची माहिती मिळाली. त्याचा परिवार घटनास्थळी पोहचल्यावर मृतदेह संदेशचा असल्याचे स्पष्ट झाले. मृताच्या डोक्याच्या मागील भागात घाव असून रक्त निघाल्याचे दिसत आहे.

तसेच शरीरावर जखमाही आढळून आल्या. यावरून त्याचा खून करून मृतदेह येथे आणून ठेवला असावा, असा कयास आहे. मृतदेहावर त्याचा मोबाईल ठेवून होता. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवून प्रकरणातील अनेक संशयास्पद मुलांना चौकशीसाठी बोलावले. यात आरोपी राकेश वाघमारे हा वारंवार बयाण बदलवत असल्याने पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला. पोलिसांनी हिसका दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. संदेश ठाकूर हा दुसऱ्या गावातून आलेल्या पाहुण्या मुलीला छेडत होता.

मागच्या वर्षीसुद्धा त्याने छेड काढली होती. ही बाब माया सोनारकर हिने राकेश वाघमारेला सांगितली. राकेशने संदेशला रात्री शिवाजी विद्यालयाच्या पटांगणावर नेऊन समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काही ऐकत नव्हता. त्यामुळे राकेशने काठीने मारून खून केल्याची कबुली दिली.

यावेळी माया सोनारकर ही महिला देखील उपस्थित होती. त्यानंतर दोघांनीही पळ काढला होता. पोलिसांनी अवघ्या दोन तासातच आरोपीला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 4:19 am

Web Title: minor boy murder in chandrapur district
Next Stories
1 बीडमधील शहरांना दहा दिवसांनी पाणी
2 बीडमध्ये तिघांचा मृत्यू ; उष्माघाताने झाल्याचा दावा
3 मराठवाडय़ात उष्णतेची लाट कायम राहणार
Just Now!
X