08 March 2021

News Flash

अल्पवयीन मुलीवर भंगारवाल्यांकडून अत्याचार

आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

(संग्रहित छायाचित्र)

विरार : वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय मुलीसोबत याच परिसरातील भंगारवाल्यांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात वालीव पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून इतर आरोपींचा शोध घेत आहेत.वालीव पोलीस ठाण्याअंतर्गत भोयदापाडा परिसरातील या अल्पवयीन मुलीवर याच परिसरात भंगारचे काम करणाऱ्या काही मुलांनी २०१९ पासून तिच्या घरातील आईवडील कामावर जात असल्याने घरात एकटीच असल्याचा फायदा घेत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. सदरची माहिती तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिल्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली. या संदर्भात सध्या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 12:09 am

Web Title: minor girl molested by scrap buyers in virar zws 70
Next Stories
1 …तर, सत्य बाहेर येणं महत्वाचं आहे – भुजबळ
2 जलयुक्त शिवार योजनेच्या ‘एसआयटी’ चौकशीवरून सचिन सावंत यांचा भाजपावर निशाणा, म्हणाले…
3 महाराष्ट्रात १९ हजारांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त, राज्याचा रिकव्हरी रेट ८४.७१ टक्के
Just Now!
X