01 March 2021

News Flash

उस्मानाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; तीन दिवसांनंतर गुन्हा दाखल

पीडितेची प्रकृती गंभीर

प्रतिकात्मक छायाचित्र

मंदिरासमोर खेळत असताना ११ वर्षीय शाळकरी मुलीला निर्जनस्थळी नेऊन चार नराधमांनी तिच्यावर सामूहिक दुष्कर्म केल्याची घटना लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे घडली. तीन दिवसानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यातील तीन आरोपी अल्पवयीन आहेत. जखमा आणि रक्तस्त्राव झाल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पीडितेला तीन दिवसांपूर्वीच लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तिसर्‍या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला.

तालुक्यातील सास्तूर गावातील मजूर कुटुंबातील ११ वर्षीय मुलगी एका मंदिरासमोर खेळत होती. गुन्ह्यातील आरोपींनी तिला गोड बोलून निर्जनस्थळी नेले व तिथे तिच्यावर सामूहिकरित्या दुष्कर्म केले. ही बाब आरोपींच्या दबावामुळे मुलीने घरी सांगितली नव्हती. मात्र तिला पोटदुखी आणि रक्तस्त्रावाचा त्रास सुरू झाल्याने आई-वडिलांनी विचारपूस केल्यानंतर पीडित मुलीने सर्व घटना सांगितली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी दिली.

जबाब आणि तक्रार न दिल्याने गुन्हा नोंदविण्यात उशीर झाल्याची माहिती आहे. पीडितेचे आई-वडील शेतमजूर आहेत. मुलीला त्रास सुरू झाल्यानंतर तिला सास्तूर येथील दवाखान्यात प्राथमिक उपचार करुन तिला पुढील उपचारासाठी लातूरला पाठविण्यात आले असून तेथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करून चारही आरोपींना तात्काळ ताब्यात घेतलं आहे आहे. चारही आरोपी अल्पवयीन आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 5:00 pm

Web Title: minor girl raped in osmanabad sgy 87
Next Stories
1 रोहित पवारांनी केलं एकनाथ खडसेंचं स्वागत; म्हणाले, “…पण निसर्गाचाच नियम आहे”
2 दानवेंनी सांगितलं एकेकाळी कसं होतं फडणवीस व खडसेंचं नातं
3 “खडसेंचं डोकं ठिकाणावर आहे ना?”
Just Now!
X