News Flash

अल्पवयीन मुलीला मद्य पाजून सामूहिक बलात्कार

पंढरपूरमध्ये पाच जणांना अटक

प्रतिनिधिक छायाचित्र

पंढरपूरमध्ये पाच जणांना अटक

येथील एका अल्पवयीन मुलीला मद्य पाजून तिच्यावर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. एक वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेबाबत पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी दिली आहे.

याबाबत पीडितेच्या आईने पंढरपूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. यानुसार मनोज माने, साहील सुधीर अभंगराव, अक्षय दिलीप कोळी, आरिफ शेख आणि माउली तुकाराम अंकुशराव अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पाचही जणांवर बलात्कारासह, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की शहरातील एका अल्पवयीन मुलीस तिच्या एका मित्राने फूस लावून अंबाबाई पटांगण येथे आणले. त्या ठिकाणी त्याच्या चार मित्रांसह पाच जणांनी पीडित मुलीला मद्य पाजून तिच्यावर बलात्कार केला. हे सर्व सुरू असताना एकाने याचे चित्रीकरण केले. हे चित्रीकरण समाजमाध्यमावर टाकण्याची धमकी देत या आरोपींनी ऑक्टोबर २०१८ पासून पुढे वारंवार पीडितेवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तसेच या ‘व्हिडीओ’च्या आधारे संबंधित तरुणाने पीडितेच्या वडिलांकडे २ लाख रुपयांच्या खंडणीची देखील मागणी केली आहे. या सर्व प्रकरणास कंटाळून संबंधित तरुणीच्या आईने पंढरपूर पोलिसांकडे धाव घेतली. यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करत या पाचही जणांविरुद्ध गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भस्मे करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 11:46 pm

Web Title: minor girl raped in pandharpur mpg 94
Next Stories
1 नदीकाठचे नुकसान टाळण्यासाठी ‘एककालिक आधार सामग्री संकलन’  
2 विठूमाऊली पूरग्रस्तांच्या मदतीला; सांगलीतील पाच गावं घेतली दत्तक
3 पंढरपूरात दारू पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
Just Now!
X