News Flash

अल्पवयीन मुलीचा खून आणि बलात्कार

पाचगणीलगत पांगारी येथील नंदनवन कॉलनीत अनेक बंगले बंद अवस्थेत आहेत.

पाचगणी येथील एका उच्चभ्रू भागातील एका बंद बंगल्यात आठ वर्षांच्या मुलीवर एका अल्पवयीन मुलानेच बलात्काराचा प्रयत्न केला. तिने जोरदार विरोध करताच तिचा खून केल्यानंतर मग त्याने तिच्यावर बलात्कार केला. ही घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आल्यावर सर्वत्र खळबळ उडाली.
पाचगणीलगत पांगारी येथील नंदनवन कॉलनीत अनेक बंगले बंद अवस्थेत आहेत. या सोसायटीतील बंगल्यांची देखभाल करण्यासाठी अनेक ठिकाणी माळीकाम करणाऱ्या कुटुंबांची नेमणूक करण्यात आलेली आहे. रविवारी सायंकाळी याच कॉलनीतील एका बंगल्यात माळीकाम करणाऱ्या एकाची मुलगी बेपत्ता झाली. तिच्या नातेवाइकांनी पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सोमवारी सायंकाळी या परिसरातील एका बंगल्यातील पाण्याच्या टाकीत या मुलीचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपअधीक्षक दीपक हुंबरे, गुन्हे अन्वेषण विभागाचे रामा गुरव, पाचगणीचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे आदींनी सोमवारी रात्रीच घटनास्थळाची पाहणी करत तपास सुरू केला. शवविच्छेदनात मुलीचा गळा दाबून खून तसेच खुनानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत पोलिसांनी परिसरातील अनेकांकडे चौकशी केली असता एका अल्पवयीन मुलाने हे कृत्य केल्याचे कबूल केले.
या मुलाने या बंद बंगल्यामध्ये तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. या वेळी तिने आरडाओरडा केल्याने त्याने तिचा गळा दाबून खून केला. तसेच यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याची कबुली या मुलाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2016 1:29 am

Web Title: minors child murder in vai
Next Stories
1 पर्ससीनवरील बंदीमुळे खलाशी माघारी जाण्यास सुरुवात
2 आदेश न मानणाऱ्या रक्षकांवर कारवाई?
3 रायगड पोलिसांचे दामिनी पथक कार्यरत
Just Now!
X