18 February 2020

News Flash

ठाकरे सरकारची कर्जमाफी दिशाभूल करणारी

माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची टीका

(संग्रहित छायाचित्र)

भाजपा सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवून त्यांना मदत केली आहे. फडणवीस सरकारने दिलेली कर्जमाफी हीच खरी कर्जमाफी असून ठाकरे सरकारने दिलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे, अशी टीका माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे.

शहरातील व्यंकटेश महाजन महाविद्यालयातील प्रमोद महाजन सभागृहात आयोजित कार्यकर्ता बठकीत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. मिलिंद पाटील, सुधीर पाटील, डॉ. गोिवद कोकाटे, अ‍ॅड. व्यंकट गुंड, रामदास कोळगे, रमेश रणदिवे, शिवाजी गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या बळावरच मागच्या वेळी भाजपाचे सरकार राज्यात आले होते. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण भागासह सर्वच क्षेत्रांचा सर्वागीण विकास करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी पक्ष नेहमी खंबीरपणे उभा असतो, असेही देशमुख यांनी सांगितले.

उस्मानाबाद भाजपा कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन यावेळी अ‍ॅड. पाटील यांनी केले.

First Published on January 20, 2020 1:11 am

Web Title: misleading thackeray governments debt waiver abn 97
Next Stories
1 संघाची हिंदूराष्ट्राची संकुचित संकल्पना कोणालाही मान्य नाही
2 सहावे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन अलिबागमध्ये
3 एसटी- इकोमध्ये अपघात; ४ ठार, ३ गंभीर
Just Now!
X