News Flash

४१ दिवसांनंतर बेपत्ता रुग्णाचा शोध

मूळचा अमरावती येथील रहिवासी अविनाश लोखंडेवर उपचार सुरू होते.

रुग्णासह पोलीस निरीक्षक उत्तम जाधव व पोलीस पथक.

अकोला : गत पाच वर्षांपासून शहरातील केळकर सन्मित्र मानस व व्यसनमुक्ती केंद्रात उपचारार्थ दाखल असलेला अविनाश लोखंडे नामक मानसिक रुग्ण करोनाबाधित होऊन कोविड रुग्णालयात दाखल झाल्यावर १५ ऑगस्टपासून बेपत्ता होता. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी प्रकरणाचा पाठपुरावा केला. अखेर काल शुक्रवारी तब्बल ४१ दिवसानंतर बेपत्ता रुग्णाला शोधण्यात पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांच्या नेतृत्वात शहर कोतवाली पोलिसांना यश आले आहे.

मूळचा अमरावती येथील रहिवासी अविनाश लोखंडेवर उपचार सुरू होते. अविनाशचे आई वडील मृत झाल्यावर त्याच्या कुटुंबात कोणीच नाही. त्याच्या दोन बहिणी अविनाशच्या उपचारांसाठी लागणारा खर्च डॉ. केळकर यांना नियमित देतात. ८ ऑगस्टला अविनाश करोनाबाधित झाल्यावर शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या कोविड कक्षात दाखल करण्यात आले होते. मात्र, १५ ऑगस्टपासून अकोला जीएमसीमधून अविनाश बेपत्ता झाला. प्रकरण दुर्लक्षित होत असताना शिवराय कुळकर्णी यांनी प्रयत्न केले. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते.

अकोला पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनात कोतवाली ठाण्याचे निरीक्षक उत्तम जाधव यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन अकोला व लगतच्या चार जिल्ह्यात अविनाशचा शोध घेतला. मानसिक आजाराने ग्रस्त अविनाशला शोधण्याचे मोठे आव्हान होते. अखेर काल रात्री कोतवाली पोलिसांना अविनाशला शोधून काढण्यात यश आले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 2:26 am

Web Title: missing covid 19 patient found after 41 days zws 70
Next Stories
1 करोनाच्या नावावर डॉक्टरची सात लाखांची फसवणूक
2 Coronavirus : विदर्भात करोनाने ३६ जणांचा मृत्यू
3 राज्यात पावसाची सरासरी
Just Now!
X