News Flash

परदेशातील ४ हजार भारतीय महाराष्ट्रात दाखल; १३०९ नागरिक मुंबईतील

...तोपर्यंत इतर राज्यातील प्रवाशी क्वारंटाइनमध्ये

परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्रानं वंदे भारत अभियान सुरू केलं आहे. (संग्रहित छायाचित्र)

करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला. करोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी केंद्रानं हा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीबरोबर देशातंर्गत प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे हजारो नागरिक परदेशात अडकून पडले होते. त्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं वंदे भारत अभियान सुरू केलं होतं. यामाध्यमातून महाराष्ट्रात ४ हजार १३ नागरिक महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयानं परदेशातून राज्यात दाखल झालेल्या भारतीय नागरिकांविषयी माहिती दिली आहे. वंदे भारत अभियानातंर्गत ३० विमानांनी १९ देशातील ४०१३ नागरिक महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. परदेशातून परतणाऱ्या नागरिकांना क्वारंटाइनमध्ये ठेवलं जात आहे. आतापर्यंत आलेल्या ४०१३ नागरिकांपैकी १३०९ नागरिक मुंबईतील आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या १६९१ इतकी आहे. इतर राज्यातील प्रवाशांची संख्या १०१३ आहे.

वंदे भारत अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात एअर इंडियाने ३० जून २०२० पर्यंत ३८ विमान फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. या मिशनअंतर्गत अतिरिक्त चार्टर विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये अमेरिका, रशिया, मध्य आशिया युरोप व आखाती देशांमधून मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या उड्डाणांचा समावेश कऱण्यात आलेला आहे.

खाडीमध्ये अडकलेल्या भारतीयांना दोहा येथून पुढील सात दिवसांमध्ये परत आणले जाईल, अशी माहिती सरकारनं दिली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियासाठीही विमान उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य सरकारनं विदेश मंत्रालयाकडे केली आहे. मुंबईतील प्रवाशांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनची सुविधा सरकारच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यांमधील प्रवाशांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

…तोपर्यंत इतर राज्यातील प्रवाशी क्वारंटाइनमध्ये

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पास संबधित राज्याकडून मिळेपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्याची व्यवस्था सरकारनं केली आहे. सदरील प्रवाशांचा वाहतूक पास संबंधित राज्याकडून मिळताच अशा प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येणार आहे, असं राज्य सरकारनं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 5:25 pm

Web Title: mission vande bharat four thousand indians returned in maharashtra bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सफाई कर्मचारी बनले लिपीक; वसई-विरार महापालिकेतील मोठा घोटाळा उघड
2 “करोना रूग्णांची आकडेवाडी कमी-अधिक दाखवून फायदा नाही”, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना पत्र
3 #MissionBeginAgain: ठाकरे सरकारकडून ‘या’ सहा गोष्टींवरील निर्बंध शिथील
Just Now!
X