सध्या सगळीकडं करोना आणि लॉकडाउन अशीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे सगळे घरात बंद आहेत. त्यामुळे रस्त्यावर जीवन जगणाऱ्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. लॉकडाउनमुळे सगळीकडे शुकशुकाट असताना औरंगाबादमध्ये लताबाई नावाच्या बेवारस वृद्धेचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह घाटी रुग्णालयात पडून होता. मात्र, कुणीही अंत्यसंस्कार करण्यास समोर आलं नाही. त्यावेळी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार केले. त्याचबरोबर मुखाग्नीही त्यांनी स्वतः दिला.

सत्तरपेक्षा जास्त वयोमान असलेल्या लताबाई यांना दोन दिवसांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला. ही घटना शिवसेनेचे सोमनाथ बोंबले व इतर कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीनं लताबाई यांना घाटी रुग्णालयात दाखल केलं. दाखल करून घेतल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान अचानक त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर घाटी प्रशासनानं नियमाप्रमाणे २४ तास त्यांच्या नातेवाईकांची वाट बघितली. मात्र, लताबाई यांचा मृतदेह घेण्यास कुणीही आलं नाही. त्यानंतर घाटी प्रशासनाकडून त्याचं पार्थिव बेवारस घोषित करण्यात आलं. शिवसैनिकांनी नियमांची पूर्तता करत लताबाई यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर कैलासनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष बाब म्हणजे आमदार अंबादास दानवे यांनी या वृद्धेला अग्नी दिला.

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : त्रासाची जबाबदारी स्वीकारली नाही
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

गुलमंडीतील सुपारी हनुमान मंदिराजवळ लताबाई भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवायच्या. गेल्या ३५ वर्षांपासून त्या इथे होत्या. अंबादास दानवे यांच्यामार्फत अंत्योदय योजनेतंर्गत बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. या योजनेतंर्गत आतापर्यंत १७६ बेवारसांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अंबादास दानवे हे सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत.