वाहतूक पोलिसाला मारहाण आणि शिवीगाळ करणे आमदार बच्चू कडू यांना महागात पडले आहे. अचलपूरमधील न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

आमदार बच्चू कडू आणि त्यांचे काही सहकारी २४ मार्च २०१६ रोजी परतवाडा येथील एस. टी. डेपो चौकातून जात होते. बस डेपोजवळ खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस उभ्या होत्या. यावरुन बच्चू कडू यांनी तिथे ड्यूटीवर असलेले वाहतूक पोलीस इंद्रजित चौधरी यांना जाब विचारला. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप करत बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंद्रजित चौधरी यांना शिवीगाळ आणि मारहाण देखील केली. या प्रकरणी चौधरी यांनी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानातील कलम ३५३ (सरकारी कामात हस्तक्षेप), ३३२, १८६ अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाची अचलपूरमधील न्यायालयात सुनावणी सुरु होती. बुधवारी न्यायालयाने बच्चू कडू यांना दोषी ठरवले. कडू यांनी एक वर्षांचा तुरुंगवास आणि ६०० रुपयांचा दंड देखील ठोठावला.

fir against power company team over extortion money
मीटरमध्ये गडबडीच्या नावावर विद्युत महामंडळाचा अभियंताच मागत होता लाच….अखेर पाठलाग करून….
pimpri Chinchwad , Police Bust Child Trafficking Gang, new born baby Trafficking Gang, Six Women Arrested, child Trafficking gang in pimpri chinchwad, pimpri chinchwad crime news,
धक्कादायक: पिंपरी चिंचवडमध्ये नवजात बालकांची तस्करी करणारी महिलांची टोळी गजाआड; सात दिवसांच बाळ…
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक
layoffs more than 400 employees
१० मिनिटांचा व्हिडीओ कॉल अन् ४०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले; ‘या’ दूरसंचार कंपनीच्या निर्णयाने कामगारांना धक्का

आ. कडू यांनी यापूर्वीही सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.अशा स्वरुपाच्या पहिल्याच खटल्यात कडू यांना शिक्षा झाल्याचे सांगितले जाते. न्यायालयाच्या निर्णयामुळे बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

‘दबंग’ बच्चू कडू

उडवाउडवीची उत्तर दिल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी मार्च २०१६ मध्ये मंत्रालयात उपसचिवाला मारहाण केली होती. तर जुलै २०१७ मध्ये अपंग पुनर्वसन कायद्याच्या अंमलबजावणीवरुन त्यांनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तांवरही हात उगारला होता.