29 September 2020

News Flash

बच्चू कडूंचा स्तुत्य उपक्रम,गरिबांना अवघ्या दोन रूपयांत जेवण

संत गाडगे बाबा रोटी अभियानाअंतर्गत ही सेवा सुरू केली

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जारी करण्यात आलं आहे. याचा आर्थिक परिणाम विविध क्षेत्रात रोजंदारीवर असलेल्या कामगारांच्या जीवनावर झाला आहे. त्यानंतर देशभरातील दिग्गज मंडळींनी कोरोना विरोधात लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मोठी आर्थिक मदत केली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही कोरोना विरोधात लढण्यासाठी गोरगरिंबाना अवघ्या दोन रूपयांत जेवण उपलबद्ध करत स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.

प्रहार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी वेगळ्या शैलीतील आंदोलनाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गोरगरिबांच्या मदतीला धावणारे नेता म्हणून बच्चू कडू यांची राज्यभर ओळख आहे. बच्चू कडू यांनी याची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. अवघ्या दोन रूपयांत जेवण उपलबद्ध करून देत लॉकडाउनमध्ये अनेकांना दिलासा दिला आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी १६ एप्रिल रोजी संत गाडगे बाबा रोटी अभियानाअंतर्गत ही सेवा सुरू केली आहे. यामध्ये गोरगरिंबासाठी अवघ्या दोन रूपयांत जेवण उपलब्दध करून दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दररोज ८०० जण या योजनेचा लाभ घेतात. चिखलदरा स्टॉप रेस्ट हाऊस परतवाडा येथे सकाळी ९ ते ११ यादरम्यान जेवण उपलबद्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2020 10:06 am

Web Title: mla bacchu kadu two rupees lunch poor people nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 Video: “तुम्ही सीपी असाल तर आम्ही पण इथले…”; विश्वास नांगरे पाटील यांना ऐकावे लागेल ‘ते’ आदेश
2 राहुल गांधी यांचे मार्गदर्शन देशहिताचे, ‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा – शिवसेना
3 Coronavirus Updates: देशातील करोनाबाधितांची संख्या १४ हजाराच्या पुढे
Just Now!
X