News Flash

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार दादाराव केचेंवर गुन्हा दाखल

केचेंनी वाढदिवशी धान्यवाटप करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या बंगल्यापुढे आज सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या

वर्ध्याचे आमदार दादाराव केचेंवर आयपीसी साथ प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र कोविंड 19 उपाय योजना नियम नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्धा जिल्ह्यातील आर्वीचे भाजपा आमदार दादाराव केचे यांनी आज आपल्या वाढदिवशी धान्यवाटप करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे केचे यांच्या बंगल्यापुढे आज सकाळपासूनच रांगा लागणे सुरू झाले. गहू, तांदूळ व अन्य किराणा स्वरूपात पिशव्या तयार होत्या. मात्र, गोरगरीबांची गर्दी वाढतच चालल्याने शेवटी एका सूज्ञ व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहोचून गर्दी पांगविली. धान्यवाटप बंद करण्यात आले. केचेंच्या घराला लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यान, त्यानंतर  काही पोलीस कर्मचारी केचेंच्या घराजवळ तैनात करण्यात आले. त्यांनतर या संदर्भात लोकसत्ताने पाठपुरावा केल्यानंतर आता कारवाई  करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 10:54 pm

Web Title: mla dadarao keche sued for violating the ban abn 97
Next Stories
1 जमाबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी आमदारास नोटीस, पोलीस मात्र अनभिज्ञच
2 राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ७४८
3 Coronavirus : लॉकडाउनमुळे रोजगार गमवलेल्याच्या हाताला मिळणार काम!
Just Now!
X