23 November 2020

News Flash

वाई चे आमदार मकरंद पाटील करोना बाधीत

खासगी रुग्णालयात उपचार सुरु

वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांना उपचारासाठी साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. मार्च महिन्यापासून करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करत आमदार पाटील प्रशासनाला सोबत घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी सतत मतदारसंघात संपर्क दौऱ्यावर होते. मार्च महिन्यात करोना प्रादुर्भाव वाढू लागला व सातारा जिल्ह्यात पहीला खंडाळा येथील बाधीत रुग्ण आढळून आला. यानंतर मुंबई व परराज्यातून आलेल्यांमुळे मतदार संघात बाधीत रुग्ण आढळून आले. मतदार संघात करोना संसर्गा बाबत प्रशासनाला सोबत घेऊन जनजागृती करत संसर्ग वाढू नये यासाठी आमदार पाटील लोकांना सतर्क करत होते.

करोना काळात सर्वसाधारण आजारावरही जनतेला सर्व उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी ते प्रयत्नशील राहिले आहेत.आमदार मकरंद पाटील करोना बाधीत झाल्याचे समजताच मतदार संघासह जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्ते,समर्थक व मित्र मंडळींना एकच धक्का बसला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 8:21 pm

Web Title: mla from wai makrand patil found corona positive psd 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 चंद्रपूर : ब्रम्हपूरी तालुक्याला पूराचा सर्वाधिक फटका
2 चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात २०३ नवे करोनाबाधित रुग्ण
3 महाराष्ट्रात ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन कायम, नियमावली जाहीर
Just Now!
X