News Flash

“धनगर समाजाला आरक्षण द्या, अन्यथा…”; गोपीचंद पडळकर यांचा ठाकरे सरकारला इशारा

गोपीचंड पडळकर यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वातावरण पेटलं असून ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. दरम्यान आरक्षणाच्या मागणीवरुन धनगर समाजही आक्रमक झाला आहे. आमदार आणि धनगर समाजाचे नेते यांनी आरक्षण मिळालं नाही तर राज्य सरकार आणि धनगर समाजातील संघर्ष अटळ आहे असा इशाराच दिला आहे. गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे.

एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, “धनगर समाजाची ही जुनी मागणी असून नव्याने मागणी करण्यात आलेली नाही. धनगर समाज गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलन करत असून रस्त्यावर उतरतोय, जेलमध्ये जातोय. पण तरीही आमची मागणी काही पूर्ण झालेली नाही. आमच्या मुलांच्या हातात एसटीचा दाखला द्या हीच आमची सरकारकडे मागणी आहे. ते कसं करायचं यासाठी विधी तज्ञांशी चर्चा करा आणि आमचा मार्ग मोकळा करा. पण सरकार यावर कोणतीही चर्चा करताना दिसत नाही हे दुर्दैवी आहे”.

“नोव्हेंबर २०१९ मध्ये हे सरकार आलं आणि आता सप्टेंबर महिना संपत आलाय. पण धनगर आरक्षणावर एकही बैठक आजवर झालेली नाही. कोर्टात केस सुरु आहे तिथे एखादा चांगला वकील देणं वैगेरे असेही काही प्रयत्न झालेले नाहीत. लोकांच्या भावना तीव्र आहेत. करोनामुळे मला अधिवेशनात जाता आलं नाही. दुर्दैवाने तिथे हा प्रश्न मांडू शकलो नाही. तिथंही मी आंदोलनाची तयारी केली होती,” अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली. सरकारने चर्चा करुन काही दिवसांत निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा संघर्ष अटळ असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 2:36 pm

Web Title: mla gopichand padalkar on dhangar reservation maharashtra government sgy 87
Next Stories
1 मोठ्या मराठा नेत्यांना वाटतं की समाजाला कधी आरक्षण मिळू नये; चंद्रकांत पाटलांचा दावा
2 “महाराष्ट्रात चाचण्या वाढवा अन्यथा करोना रुग्ण आणि मृत्यू वाढतील”
3 हे एकप्रकारे श्रमिकांचे खूनच; रोहित पवारांनी मोदी सरकारच्या उत्तरावर व्यक्त केली नाराजी
Just Now!
X