28 September 2020

News Flash

जैतापूर प्रकल्पविरोधी मोर्चा सेनेचे आमदार-खासदार गैरहजर

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित अणु ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात बुधवारी साखरीनाटे येथे जनहक्क समितीच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मात्र या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध केलेले

| June 19, 2014 12:50 pm

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित अणु ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात बुधवारी साखरीनाटे येथे जनहक्क समितीच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मात्र या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध केलेले सेनेचे आमदार राजन साळवी आणि नवनिर्वाचित खासदार विनायक राऊत गैरहजर राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात आलेल्या नवीन शासनाचे लक्ष प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीकडे वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, समितीचे अध्यक्ष भिकाजी वाघधरे, मच्छीमार नेते अमजद बोरकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अजित नारकर, पंचायत समितीचे सभापती कमलाकर कदम इत्यादी नेते मोर्चामध्ये सहभागी झाले. शिवसेनेचे स्थानिक आमदार राजन साळवी यांनी या प्रकल्पाला  सुरुवातीपासून विरोध केला असून, अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले आहे. केंद्रामध्ये भाजपप्रणीत सरकार आल्यानंतर केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रकल्पाच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे. मात्र शिवसेनेचा प्रकल्पाला विरोध कायम असल्याचे साळवी यांनी स्पष्ट केले होते. या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले खासदार राऊत यांनीही साळवी यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. मात्र निवडणुकीनंतर प्रथमच काढण्यात आलेल्या प्रकल्पविरोधी मोर्चाला हे दोन्ही नेते बुधवारी गैरहजर राहिले. मुंबईत पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी ते गेले असल्याचे सेनेच्या गोटातून सांगण्यात आले. मात्र प्रकल्पविरोधी स्थानिक ग्रामस्थांच्या दृष्टीने तो चर्चेचा विषय झाला. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन या प्रकल्पाच्या विरोधामागील भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णयही बुधवारी मोर्चानंतर झालेल्या सभेत घेण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 12:50 pm

Web Title: mla mps absent in anti jaitapur project rally
Next Stories
1 केंद्रातील सत्ताबदलाने माळशेज रेल्वेच्या आशा पल्लवित
2 मुलाने जेवणास नकार दिल्याने पित्याची आत्महत्या
3 मुलाने जेवणास नकार दिल्याने पित्याची आत्महत्या
Just Now!
X