25 February 2021

News Flash

आमदारांच्या पीएच्या नावाने दबावतंत्र

बांधकामावर कारवाई होऊ नये म्हणून पालघर तहसीलदारांना दूरध्वनी

जमीन लाटणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी पालघरचे तहसीलदार यांच्या सोबत हुज्जत घालून जोरजोरात ओरडत असलेला माकपाचा कार्यकर्ता.

बांधकामावर कारवाई होऊ नये म्हणून पालघर तहसीलदारांना दूरध्वनी

बोईसर : सरावली येथील जमीन गिळंकृत करणाऱ्यांना वाचवण्यासाठी व त्याच्यावर कारवाई होऊ नये यासाठी आमदारांच्या स्वीय साहाय्यकाच्या (पीए) नावाचा वापर करून पालघरच्या तहसीलदार यांच्यावर दबाव आणण्याचा प्रकार समोर आला आहे. या दूरध्वनीद्वारे डहाणू विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांचा पीए बोलतोय अशी बतावणी करून ‘आपल्या कार्यकर्त्यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करू नका’ असा दबाव टाकण्यात आला होता. मात्र तहसीलदार यांनी दबावाखाली न येता शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामावर हातोडा मारला होता.

अवधनगर भंगारगल्ली भागात सहा गाळे असलेल्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. खालच्या मजल्यावर असलेल्या सहा गाळ्यांची भिंत महसूल विभागाने ५ जानेवारी रोजी तोडली होती. मात्र पुन्हा या ठिकाणी बांधकाम करण्यात आल्याने तसेच करोनाकाळामध्ये दुकाने थाटली गेल्याने पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांनी १५ जानेवारी रोजी बांधकाम तोडण्याची सुरुवात केली होती.

या कारवाईच्या दरम्यान डॉ. आदित्य अहिरे यांनी आपण आमदार विनोद निकोले यांचा स्वीय साहाय्यक बोलतोय, ‘आपण आमच्या कार्यकर्त्यांच्या बांधकामावर पण कारवाई करायला जाणार आहेत का, तिथे जाऊ नका आपला कार्यकर्ता आहे,’ असे भ्रमणध्वनीवरून सांगितले. अनधिकृत बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीवर माकप पक्षांचे झेंडेदेखील लावण्यात आले होते. माकप आमदारांचा स्वीय साहाय्यक बोलतो असे सांगून जमीन लाटणाऱ्यांसाठी शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असल्याने भूमाफियांना वाचवण्यासाठी अशा प्रकारे संघटना आपल्या ताकदीचा वापर करतात हे लक्षात येते. मुळात स्वीय साहाय्यक बोलतो अशी बतावणी करणारे डॉ. आदित्य अहिरे हे नेमके त्या पदावर आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.

अवधनगर भंगारगल्ली भागात सहा गाळे असलेली इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. खालच्या मजल्यावर असलेल्या सहा गाळ्यांची भिंत महसूल विभागाने ५ जानेवारी रोजी तोडली होती, मात्र पुन्हा या ठिकाणी बांधकाम करण्यात आल्याने महसूल विभागाने कारवाई केली. दरम्यान, या अनधिकृत बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीवर माकप पक्षांचे झेंडेदेखील लावण्यात आले होते. हा दबावतंत्राचा भाग असल्याचे बोलले जात आहे.

पालघर तहसीलदार यांना कोणत्या ठिकाणी कारवाई सुरू आहे, याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधला होता. पीए बोलतो असे सांगून तहसीलदार यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला नाही.

– डॉ. आदित्य अहिरे, माकप डहाणू

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 2:23 am

Web Title: mla s pa telephone to palghar tehsildar to stop action on construction zws 70
Next Stories
1 शहरबात : पालघर शहर २२ वर्षांनंतर विकासाच्या दिशेने
2 शाळांची मनमानी सुरूच
3 सदनिका विकण्याच्या नावाखाली २७ जणांची फसवणूक
Just Now!
X