05 July 2020

News Flash

गोकुळ मल्टीस्टेट वाद: “गोकुळ हातात न राहण्याच्याच भितीनं सभेत सत्ताधाऱ्यांचा गोंधळ”

गेल्यावर्षीही गोकुळ मल्टीस्टेट करण्याला विरोध करण्यात आला होता.

संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या बुधवारी पार पडलेल्या विशेष सभेत बुधवारी जोरदार गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं. गोकुळ मल्टीस्टेट करण्याचा सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव होता. परंतु सत्ताधारी पक्षानेच दोन दिवसांपूर्वी तो मागे घेतला होता. परंतु बुधवारी सभेला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच सभेत गोधळ झाल्याचं पहायला मिळालं.
दरम्यान, सत्ताधाऱ्यांचीच लोकं सभेत गोंधळ घालत होती. हवं असल्यास त्याचं चित्रिकरण पहावं. गोकुळ आपल्या हातात राहिल किंवा नाही या भितीमुळेच सत्ताधारी लोकांनी सभेत गोंधळ घातल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला.
पराभवामुळे महाडिक संपतील हा समज काढून टाकावा. २०१४ मध्ये तुमचाही पराभव झाला होता, असा टोला महिडिक यांनी यावेळी लगावला. तर गोकुळच्या वाटचालीशी महाडिक यांचा संबंध नाही. त्यांचा केवळ भाड्यानं टँकर लावण्याएवढाच संबंध आहे. संघाच्या उभारणीचं श्रेय त्यांनी घेऊ नये. आगामी निवडणुकीत सत्तांतर होणार असल्याच्याच भितीने सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातल्याचे सतेज पाटील म्हणाले.

राज्यातील सर्वात मोठा सहकारी दूध प्रकल्प असलेल्या गोकुळच्या बहुराज्य संस्था नोंदणीचा प्रस्ताव सत्तारूढ गटाने स्वतःहून गुंडाळला आहे. या विरोधात जोरदार जनमत उभे राहिल्याने संचालक मंडळावर ही वेळ आली आहे. संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी आज एक पत्रक काढत सभासदांच्या भावना लक्षात घेऊन सेंट्रल रजिस्ट्रारकडे नोंदणीसाठी पाठवलेला बहुराज्यचा (मल्टिस्टेट) प्रस्ताव सध्या रद्द करण्यात येत आहे, असे पत्रक प्रसिद्ध केले होते. या निर्णयाचे स्वागत गोकुळ विरोधात संघर्ष करणारे आमदार सतेज पाटील यांनी केले असून गोकुळ विरोधातील अपप्रवृत्ती, गैरव्यवहार याच्याविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन केलेल्या दोन वर्षांच्या लढ्याला यश आल्याचे त्यांनी म्हटले होते.

गोकुळ संघ बहुराज्य करण्याचा सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा प्रयत्न आहे. गतवर्षी ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध केला होता. सभेत यावरुन प्रचंड राडा झाल्याने अवघ्या तीन मिनिटांतच सभा गुंडाळण्याची वेळ सत्तारुढ गटावर आली होती. त्यानंतर गोकुळ बचाव कृती समितीने समांतर सभा घेत, सत्ताधारी संचालक मंडळाचा तीव्र शब्दांत समाचार घेतला होता. या विरोधात न्यायालयात कायदेशीर लढाई लढण्याचा इशाराही कृती समितीने दिला होता. गोकुळची झालेली सर्वसाधारण सभा म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असून, गोकुळ संघ बहुराज्य करण्याचा ठराव आणि भ्रष्ट कारभारा विरोधात कृती समितीचा हा लढा यापुढे सुरूच राहणार असल्याचा इशारा गोकुळ बचाव कृती समितीच्यावतीने आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिला होता.

दरम्यान, कर्नाटक राज्य शासनाने गोकुळ बहुराज्य करण्यास परवानगी नाकारली होती. तर लोकसभा निवडणुकीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बहुराज्य होऊ देणार नाही, अशी घोषणा केली होती. याचा राजकीय फटका लोकसभा निवडणुकीत माजी खासदार धनंजय महाडिक आणि आता विधानसभा निवडणुकीत माजी आमदार अमल महाडिक यांना बसला आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2019 2:08 pm

Web Title: mla satej patil criticize former mp dhanajay mahadik gokul milk maltistate issue kolhapur jud 87
Next Stories
1 महाबळेश्वरचा जीवघेणा धबधबा, दगड डोक्यात कोसळल्याने पर्यटक तरुणीचा मृत्यू
2 “शरद पवारांकडून सगळ्याच गोष्टी शिकण्यासारख्या”
3 निवडणुकीत भाजपा उमेदवारालाच चारली धुळ, पण आता दिला बिनशर्त पाठिंबा
Just Now!
X