शहापुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. दरम्यान, यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेहेदेखील उपस्थित होते. तसेच बुधवारी दुपारी ते आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

बरोरा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहापूरचे आमदार असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. पांडुरंग बरोरा यांचे वडिल महादू बरोरा हेदेखील शहापुरमधून चार वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकांपासून बरोरा राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. अखेर त्यांनी राष्ट्रवादी रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बरोरा यांच्याशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच त्यांचा राजीनामा हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Tamil Nadu news M. K. Stalin
तमिळनाडूत यंदा तिरंगी लढतीची शक्यता; द्रमुक, अण्णाद्रमुक अन् भाजपामध्ये सामना होणार
Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
EKnath Shinde and Uddhav Thackeray (1)
“दोन प्रादेशिक पक्षांकडे अजेंडा अन् झेंडाही नाही, त्यांच्यामुळे काँग्रेसची…”, मुख्यमंत्र्यांचा मविआला टोला
NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?


त्यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची शहापुरमधील ताकद कमी होईल, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. यापूर्वी बरोरा यांच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक मेसेजेस व्हायरल झाले होते. तसेच ‘आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर राष्ट्रवादीच्या पांडुरंगाच्या हातात भगवी पताका’ अशा आशयाचाही मेसेज व्हायरल झाला होता.