24 January 2021

News Flash

विधान परिषद निवडणूक; अजित पवारांनी कार्यकर्त्याला दिलेला शब्द पाळला

पुण्यात झालेल्या भाषणात केली होती घोषणा

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे यांचं वक्तृत्व कौशल्याविषयी महाराष्ट्र चांगलाच परिचित आहे. त्याचबरोबर अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे घेतलेला निर्णय तडीस नेणं. विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रानं याचा प्रत्यय विजय शिवतारे यांच्या पराभवावेळी घेतला. मात्र, याच निवडणुकीनंतर पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवारांनी एक घोषणा केली होती. अखेर अजित पवार यांनी कार्यकर्त्याला दिलेला पाळला असल्याचं विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं दिसून आलं आहे.

“मी जर ठरवलं, तर कुणी आमदार होऊ शकत नाही,” हे अजित पवारांचं एका प्रचार सभेतलं विधान निवडणुकीच्या प्रचारात चांगलंच गाजलं. माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या मतदार संघात झालेल्या प्रचार सभेत बोलताना अजित पवारांनी शिवतारेंना या शब्दात इशारा दिला होता. त्यानंतर आलेल्या निकालात शिवतारे यांना पराभव स्वीकारावा लागला.

आणखी वाचा- विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखल केला अर्ज

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अजित पवार यांचं पुण्यात १४ डिसेंबर रोजी एक कार्यक्रम झाला. या वेळी केलेल्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांना आमदार करणार, अशी घोषणा केली होती. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं दोन उमेदवारांची नावं रविवारी जाहीर केली. त्यात एक नाव अमोल मिटकरी यांचं आहे.

आणखी वाचा- … आणि निवडणुकीच्या घोडेबाजारासाठी आमदारांनी मुंबईत यायचं, हे योग्य नव्हते- शिवसेना

२०१९मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्याबरोबर अजित पवार, खासदार अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी यांनी प्रचारात झोकून दिलं होतं. राष्ट्रवादीला मिळालेल्या यशात अमोल मिटकरी यांनी घेतलेल्या प्रचार संभाचंही मोठं योगदान होतं. राष्ट्रवादीच्या यशातील त्यांच्या योगदानाची दखल घेत अजित पवार यांनी अमोल मिटकरींना आमदार करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा पूर्ण होण्याची केवळ औपचारिकताच राहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 1:56 pm

Web Title: mlc election ajit pawar fulfilled his promise bmh 90
Next Stories
1 Lockdown: परिस्थितीच्या अपंगत्वामुळं शारीरिक अपंगत्वाचं झालं ओझं
2 अत्यंत महत्त्वाच्या विषयाला लाल फितीत का गुंडाळून ठेवताय?; आशिष शेलार यांचा सरकारला सवाल
3 एसटीच्या मोफत प्रवासासंदर्भात गोंधळ; मुंबई सेंट्रल बस स्थानकाबाहेर मोठी गर्दी
Just Now!
X