29 November 2020

News Flash

“फडणवीस उठाबशा काढत असले, तरी त्यांना माहितीये…”; जयंत पाटलांचं भाजपाला आव्हान

मुंबई महापालिका निवडणुकीवरून लगावला टोला

जयंत पाटील व देवेंद्र फडणवीस. (संग्रहित छायाचित्र)

राज्यात सध्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचा प्रचार सुरू झाला आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची चर्चाही सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेवरून भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशी राजकीय चकमक झडताना दिसत असून, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला चितपट करणार असल्याचा दावा केला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचा आढावा घेतला. तीनही पक्षाचे नेते यावेळी उपस्थितीत होते. अरुण लाड व जयंत आजगावकर यांच्या प्रचाराची सुरवात झाली. उद्यापासून पुणे जिल्ह्यात प्रचार सुरू होणार असून, त्याचाही आढावा पाटील यांनी घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले,”राज्यात पाच जागांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. पाच ही जागांवर आम्ही निवडून येऊ. आम्ही तिन्ही पक्ष संयुक्त प्रचार करत आहोत, कोणी कुठं जायच तसं ठरलेलं आहे. देशात आर्थिक मंदीमुळे पदवीधरांसमोर मोठं संकट उभे राहिले आहे. कोविडच्या आधी आर्थिक मंदी आली आहे. त्यामुळे यातून बाहेर काढणे गरजेच आहे. आमचं सरकार ते करेल,” असं पाटील म्हणाले.

“वीज बिलाचे ६७ हजार कोटी ग्राहकांकडे थकलेले आहेत. सर्व स्तरातील पैसे थकलेले आहेत. एकीकडे वीज दरवाढ आहे. त्यामुळे असं का झालं याची कारणी मीमांसा करत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठलाही दुजाभाव करत नाहीत. मुबंईत करोना रुग्णसंख्या वाढली आहे, त्यामुळे परत करोना वाढू नये.पुढील दहा पंधरा दिवस काळजी घेणं गरजेचं आहे. पालकांनी संभ्रमात राहू नये. स्थानिक लोकांनी निर्णय घेतला पाहिजे. मुंबईत बसून निर्णय घेतला, तरी स्थानिकांनी निर्णय घेणं महत्वाचे आहे,” असं आवाहनही जयंत पाटील यांनी केलं.

“मुबंई महापालिका निवडणुकीत सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत स्थानिक स्तरावर निर्णय होईल. अजून महापालिका निवडणूक लांब आहेत, त्यामुळे अजून वेळ आहे.
भाजपा मुबंईमध्ये चितपट होणार. आतापासून सुरुवात केली तर त्यांना महत्व देऊ नका. ज्यांचा पराभव होणार ते आधीच तयारी करत आहे. त्यांना आम्हीच चितपट करणार आहे. देवेंद्र फडणवीस आता उठाबशा काढत असले, तरी त्यांना माहिती झाले आहे की, पराभव होणार आहे म्हणून ते आता तयारी करत आहे,” असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 2:33 pm

Web Title: mlc election bmc election jayant patil ncp leader devendra fadnavis bjp bmh 90
Next Stories
1 अजित पवारांच्या शेजाऱ्याची आत्महत्या : “राष्ट्रवादीच्या धेंडांवर कारवाई करणं मुख्यमंत्र्यांना झेपेल काय?”
2 अजित पवारांच्या शेजाऱ्याने केली आत्महत्या; चिठ्ठीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावं
3 निरंतर संघर्षाची प्रेरणा त्यांच्याकडूनच मिळाली -राज ठाकरे
Just Now!
X