28 March 2020

News Flash

विधान परिषद : धनंजय मुंडे यांच्या जागेवर काँग्रेसच्या संजय दौंड यांना संधी

दोन नावे होती स्पर्धेत

संग्रहित

राज्याचे समाजकल्याण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांची विधान परिषदेतील जागा रिक्त झाली आहे. या जागेवर कुणाला संधी दिली जाणार, याविषयी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर काँग्रेसच्या संजय दौंड यांना संधी दिली आहे. या जागेसाठी २४ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.

विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. सध्या धनंजय मुंडे हे राज्याचे समाज कल्याण मंत्री आहेत. धनंजय मुंडे हे विधानसभेत गेल्यानं त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी भाजपानं राजन तेली यांना अगोदरच उमेदवारी दिली आहे.

दोन नावांची होती चर्चा –

धनंजय मुंडे यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली. सुरूवातीला या जागेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. पुढे या चर्चेला पूर्णविराम मिळाला. त्यानंतर दोन नावे चर्चेत होती. यात राष्ट्रवादी कुणाला संधी देणार याकडे सगळ्याचं लक्ष होतं. राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे आणि काँग्रेसचे संजय दौंड यांची नावे स्पर्धेत होती. त्यात संजय दौंड यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या जागेवर काँगेसचे संजय दौंड का?

विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून उमेदवार असलेल्या धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी संजय दौंड यांनी प्रयत्न केले. त्याचबरोबर दौंड काँग्रेसमध्ये असले, दौंड व पवार कुटुंबीयांचे संबंध चांगले आहेत. संजय दौंड यांचे वडील पंडितराव दौंड हे मंत्री होते. अल्पकाळच ते मंत्रिपदावर राहिले. त्याच काळात शरद पवार यांनी संजय दौंड यांना संधी देण्याचं वचन दिलं होतं, अशीही चर्चा सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 11:12 am

Web Title: mlc election sanjay daund will contest election on dhananjay munde seat bmh 90
Next Stories
1 “पक्ष कार्यालयात पुस्तक प्रसिद्ध झाले, संबंध नाही कसा? “
2 ‘मलईच कमवायची तर, मंत्री कशाला होता, ठेकेदारच व्हा’
3 एकेकाळची प्रिय मित्र असलेली शिवसेना आता पूर्व मित्र- दानवे
Just Now!
X