28 September 2020

News Flash

निवडणुकीच्या वेळी येणारे मुल्ला मौलवी आता कुठे?; राज ठाकरेंचा संतप्त सवाल

मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

निवडणुकीच्या काळात कुणाला मतदान करावं सांगायला येणारे मुल्ला मौलवी आता आहेत कुठे ? असा संतप्त सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. करोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानी एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांनी मरकजच्या प्रकरणावरही भाष्य केलं. “मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांची वैद्यकीय तपासणी बंद करायला हवी. लोकांच्या अंगावर थुकतायत का, या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे. लॉकडाउन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच,” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. हे जे मुल्ला-मौलवी कुठे आहेत ते बघायचं आहे, निवडणुकीवेळी कुणाला मतदान करायचं सांगता, मग अशावेळी तुम्हाला सांगता येत नाही का? असंही त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- Coronavirus: समाजाची जबाबदारी मोठी, नुसता यंत्रणांना दोष नको – राज ठाकरे

“… अन्यथा अर्थसंकट निर्माण होईल”
“हा जो लॉकडाउन आहे गांभीर्याने घ्यावा. लोकांना रेशन, भाजीचे असे अनेक प्रश्न पडले आहेत. अनेक ठिकाणी सरकार उपलब्ध करुन देत आहे. पण मला भीती एका गोष्टीची आहे ती म्हणजे जर लॉक़डाउन वाढवला तर त्याचे गंभीर परिणाम होतील. सरकारकडे कोणताही कर येणार नाही. उद्योगधंद्यावर परिणाम होतील. आधीच ५० टक्क्यांवर पगार आणले आहेत. जितके दिवस वाढवू तसा परिणाम होत जाणार. शिस्त पाळली जाणार नाही तर अर्थसंकट निर्माण होईल. मोदी यावर काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती,” असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा किरण दाखवायला हवा होता – राज ठाकरे

मोदींवर टीका
“सर्व डॉक्टर, शेतकरी, पोलीस, वीज-पाणी पुरवठा करणारे कर्मचारी सगळे आपला जीव धोक्या घालून काम करत आहे. पण लोकांना त्याचं गांभीर्य कळत नाही आहे. याकडे लक्ष दिलं पाहिजे. मी त्या दिवशी पंतप्रधानांचं भाषण ऐकलं. आता खरं तर वैद्यकीय यंत्रणा कशा पद्धतीने राबवली जात आहे. मृतांचा नेमकी संख्या काय आहे ? खरंच किती रुग्ण आहेत ? याबाबत संभ्रमावस्था आहे. ती दूर करण्याची जबाबदारी त्या पदावर बसलेल्या व्यक्तीची असते. त्यांनी ती संपवायची असते,” असं राज ठाकरेंनी म्हटलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2020 12:40 pm

Web Title: mns chief raj thackeray criticize maulavis and asked where are they now coronavirus jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 टेन्शन कायम! ४७ नवे करोना पॉझिटिव्ह, महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ५३७
2 Video: कबूल… कबूल… कबूल… व्हिडीओ कॉलवर केले विवाहाचे सोपस्कार
3 Coronavirus: समाजाची जबाबदारी मोठी, नुसता यंत्रणांना दोष नको – राज ठाकरे
Just Now!
X