20 October 2020

News Flash

बाकीचे नालायक ठरल्याशिवाय मनसेची आठवण येत नाही: राज ठाकरे

ज्यांच्या हातात महाराष्ट्राच्या जनतेने सत्ता दिली त्यांनी राज्याची वाट लावली आहे. सत्ताधाऱ्यांनी राज्याचा सत्यानाश केला आहे.

राज ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

ज्यांच्या हातात महाराष्ट्राच्या जनतेने सत्ता दिली त्यांनी राज्याची वाट लावली आहे. सत्ताधाऱ्यांनी राज्याचा सत्यानाश केला आहे. बाकीचे नालायक ठरल्याशिवाय तुम्हाला मनसेची आठवण येत नाही, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे केले. ते आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकरांशी बोलताना त्यांनी इव्हीएम, आरक्षणाबाबतही भाष्य करत सत्ताधारी भाजपा-शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला. राज यांनी यावेळी माध्यमांवरही भाष्य केले. ज्या पद्धतीने मला प्रश्न विचारता तसेच प्रश्न सत्ताधाऱ्यांना का विचारत नाही, असा सवाल त्यांनी माध्यम प्रतिनिधींना केला. हा दौरा संघटनात्मक बदलासाठी असून संघटनेत अनेक बदल केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपा इव्हीएमचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप राज यांनी केला. इव्हीएमबद्दल मी नेहमी बोलतो. अनेक ठिकाणी इव्हीएममध्ये घोळ असल्याचे निवडणुकांमध्ये दिसून येत आहे. महापालिका निवडणुकींच्यावेळी आमच्या अनेक उमेदवारांना शून्य मते मिळाली. शून्य मते कशी पडू शकतात ? त्या उमेदवाराला स्वत:चे तर मत पडू शकते की नाही, असा उलट सवाल त्यांनी केला. अशाच प्रकारचे घोळ संपूर्ण देशभरात सुरू आहेत, नाशिकमध्येही असेच झाल्याचे त्यांनी म्हटले.

आरक्षण आणि विविध जातींमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर भाष्य करताना राज म्हणाले, ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले. त्या महाराष्ट्राचे आज प्रबोधन करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात आज एकमेकांकडे अत्यंत विखारी पद्धतीने पाहिजे जात आहे. प्रत्येकजण जातीकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहतोय. देशातील प्रत्येक गोष्ट आरक्षणाच्या दृष्टीने पाहिली तर आपलं सगळे संपले म्हणून समजा, असा इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्रात हे काय चाललंय, असा प्रश्न विचारत काँग्रेस-राष्ट्रवादी असो किंवा भाजपा-शिवसेना.. याच्यात जनतेचा नाहक बळी जातोय. भारतातल्या इतक्या समृद्ध राज्याला आपला शत्रू कोण आहे हेच समजत नाही, त्यामुळे बाहेरच्यांचे फावते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

औरंगाबादमधील कचऱ्याच्या मुद्द्यावरून त्यांनी नाशिक महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनाची माहिती दिली. नाशिकसारखी कचरा व्यवस्थानाची पद्धत देशभरात कुठेच पाहायला मिळत नाही. मनसेच्या सत्ताकाळात नाशिक शहरात जेवढी कामे झाली ती यापूर्वीही नाही आणि नंतरही झाली नसल्याचे तेथील जनता आता म्हणत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 11:22 am

Web Title: mns chief raj thackeray marathwada tour aurangabad speaks on various issue
Next Stories
1 बोनस दिला जातो मग शेतकऱ्यांना अनुदान का नाही ? : राजू शेट्टी
2 दूध कोंडी आंदोलनाचा आज चौथा दिवस
3 युवराजांचे आगमन आणि प्रभू की लीला
Just Now!
X