प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी आणि शाह हे दोघे लाल किल्ल्यावर लोकशाहीला फासावर लटकवत असल्याचे या व्यंगचित्रातून दाखवण्यात आले आहे.

राज ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी ट्विटरवर व्यंगचित्र शेअर केले आहे. या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी भाजपा सरकारच्या काळात लोकशाहीची गळचेपी होत असल्याचे दाखवले आहे. व्यंगचित्रात अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावर दाखवले आहे. ते दोघे लोकशाहीला फासावर लटकवत आहे. या व्यंगचित्रात राज ठाकरे म्हणतात, स्वतंत्रते न बघवते.

devendra fadanvis
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी; चित्रफीत शेअर करणाऱ्याला अटक
dombivli, akhil bhartiya brahman mahasangh
जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
What Amit Shah Said About Uddhav Thackeray?
“उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, म्हणून…”; अमित शाह यांचा गंभीर आरोप

गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे व्यंगचित्राच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपावर टीका करत आहे. गेल्या आठवड्यातही त्यांनी मोदींवर टीका केली होती. काँग्रेसने मोदींना छळले, म्हणून मोदी जनतेला छळत असल्याचा टोला राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून लगावला होता.